Raj Thackeray Uddhav Thackeray : मोठी बातमी! ठाकरे बंधूंमध्ये आज लंच डिप्लोमसी! राज कुटुंबीयांसह मातोश्रीवर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Raj Thackeray Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने आज आणखी एक पाऊल पडले आहे. राज ठाकरे हे आज कुटुंबीयांसह मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात महत्त्वाची घडामोड झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने आज आणखी एक पाऊल पडले आहे. राज ठाकरे हे आज कुटुंबीयांसह मातोश्रीवर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील तीन महिन्यात राज यांची ही मातोश्रीवरील तिसरी भेट आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे हे अचानक मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर आज राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झाले.
'मातोश्री'वर आज होत असलेली राज ठाकरे यांची भेट ही कौटुंबिक स्नेह भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरे हे आपल्या आईंसोबत मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबाची आज स्नेह भोजनासाठी भेट होत असली तरी राजकीय अर्थ देखील काढण्यात येत आहे.
advertisement
राज ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'त जाण्याआधी राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी आई सोबत आहे असे म्हणत राजकीय भेट असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लावला. राज ठाकरे यांच्या मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या मावशी आणि काकू देखील आहेत. गणेशोत्सवानंतरही उद्धव ठाकरे हे अचानकपणे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. त्यावेळी देखील उद्धव यांची भेट ही कौटुंबिक असल्याची माहिती देण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात राज यांच्या आईंनी उद्धव यांना पुन्हा घरी येण्यास सांगितले होते. मावशींच्या सुचनेवरून उद्धव हे शिवतीर्थावर गेल्याची माहिती समोर आली.
advertisement
सविस्तर बातमी थोड्याच वेळात...
>> ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला
> 5 जुलै 2025
मराठी विजयी मेळावा, 2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र
> 27 जुलै 2025
मातोश्री- उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी 'मातोश्री'वर जाऊन शुभेच्छा दिल्या
advertisement
> 27 ऑगस्ट 2025
शिवतीर्थ निवासस्थान, गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब 'शिवतीर्थ'वर
> 10 सप्टेंबर 2025
शिवतीर्थ निवासस्थान, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीला, कौटुंबिक भेट झाल्याची माहिती.
> 5 ऑक्टोबर 2025
advertisement
राज ठाकरे-शर्मिला ठाकरे मातोश्रीवर दाखल, ठाकरे बंधूंमध्ये 40 मिनिटे चर्चा... कौटुंबिक भेट असल्याची माहिती..
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2025 12:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray Uddhav Thackeray : मोठी बातमी! ठाकरे बंधूंमध्ये आज लंच डिप्लोमसी! राज कुटुंबीयांसह मातोश्रीवर