सुट्टीच्या दिवशीही राणीची बाग पर्यटकांसाठी खुली, ५ नोव्हेंबरसाठी 'वेलकम'
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते.
मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. असे असले तरी, बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात येत आहे.
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.
सबब, या ठरावानुसार बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 7:27 PM IST


