IND vs AUS : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धमाका, टीम इंडिया संकटात, आता ट्रॉफीचं स्वप्न स्मृतीच्या हातात!

Last Updated:

भारताविरुद्धच्या महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने मोठा स्कोअर केला आहे, त्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली आहे.

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धमाका, टीम इंडिया संकटात, आता ट्रॉफीचं स्वप्न स्मृतीच्या हातात!
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धमाका, टीम इंडिया संकटात, आता ट्रॉफीचं स्वप्न स्मृतीच्या हातात!
नवी मुंबई : भारताविरुद्धच्या महिला वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा 49.5 ओव्हरमध्ये 338 रनवर ऑलआऊट झाला आहे. फोबे लिचफिल्डने 93 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली, तर एलिस पेरीने 77 आणि ऍशलेघ गार्डनरने 63 रन केले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
भारताकडून श्री चरिणी आणि दीप्ती शर्मा यांना 2-2 विकेट मिळाल्या. तर क्रांती गौड, अमनजोत कौर आणि राधा यादव यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात विजय मिळवणारी टीम फायनलला पोहोचेल. फायनलमध्ये विजेत्या टीमचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता.
advertisement
याआधी ग्रुप स्टेजला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. तसंच या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही, त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्यासाठी इतिहास घडवावा लागणार आहे. स्पर्धेमध्ये टीम इंडियाची कामगिरी म्हणावी तशी चांगली झालेली नाही. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, त्यामुळे सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी टीम इंडिया चौथी टीम ठरली. आता सेमी फायनलमध्ये विजय मिळवण्यासाठी भारताला स्मृती मंधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या बॅटिंगवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement

भारताची प्लेइंग इलेव्हन

शफाली वर्मा, स्मृती मंधना, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरिणी, रेणुका सिंग ठाकूर
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा धमाका, टीम इंडिया संकटात, आता ट्रॉफीचं स्वप्न स्मृतीच्या हातात!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement