Rohit Arya Encounter: 5 दिवस 100 मुलं आणि एन्काउंटर, सिनेमाला लाजवेल असं प्लॅनिंग, रोहित आर्यानं असं का केलं?

Last Updated:

मुंबईतील  पवई भागात ही घटना घडली आहे. रोहित आर्या असं या माथेफिरू व्यक्तीचं नाव आहे. त्याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता.

News18
News18
मुंबई : एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना मुंबईमध्ये घडली आहे. एका माथेफिरू तरुणाने १७ विद्यार्थ्यांचं अपहरण करून ओलीस ठेवलं होतं. पण या मुलांची सुटका करताना चकमकीत अपहरणकर्ता रोहित आर्या ठार झाला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील पाच दिवसांपासून रोहित आर्या हा मुलांचं ऑडिशन घेत असल्याची माहिती समोर आली आहे. पाच दिवसांमध्ये १०० विद्यार्थ्यांचं ऑडिशन घेतलं होतं.
मुंबईतील  पवई भागात ही घटना घडली आहे. रोहित आर्या असं या माथेफिरू व्यक्तीचं नाव आहे. त्याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्याने सरकारकडे काही गोष्टींची मागणी केली होती. विशेष म्हणजे, मागील पाच दिवसांपासून तो पवईतील रा स्टुडिओमध्ये मुलांचं ऑडिशन घेत होता. मागील ५ दिवसांपासून १०० मुलांचं ऑडिशन घेतलं होतं. त्यानंतर आज त्याने १७ मुलांना स्टुडिओमध्ये बोलावलं होतं, सकाळी १० वाजता मुलं Ra studio पोहोचले होते. पण मुलं जेव्हा दुपारी १ वाजला तरी घरी पोहोचले नाही, त्याामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली असता मुलांचं अपहरण झाल्याचं समोर आलं.
advertisement
रोहित आर्याने सुरू केली होती महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर संकल्पना
रोहित आर्य याने २०२३ मध्ये महाराष्ट्रात स्वच्छता मॉनिटर संकल्पना सुरू केली होती. एका प्रादेशिक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांच्याविरुद्ध बाहेर निषेध करताना दिसलं. त्याने सांगितलं की, त्यांना थकबाकी देण्यात आली नाही आणि या संकल्पनेचे श्रेय त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलं.
advertisement
पवईच्या स्टुडिओमध्ये काय झालं?
तब्बल सव्वादोन तास मुलांच्या सुटकेचा थरार चालला. वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी ही मुलं पवईमध्ये आली होती. मागच्या 6 दिवसांपासून मुलं ऑडिशनसाठी येत होती. दुपार झाली तरी मुलं जेवायला आली नाहीत, त्यामुळे पालकांची चिंता वाढली. यानंतर दुपारी 1.45 वाजता पालकांनी पोलिसांना फोन केला. रोहित आर्य याने 17 मुलं आणि एका वयस्कर माणसाला ओलीस ठेवलं होतं. दुपारी 4 वाजता पोलीस बाथरूममधून इमारतीमध्ये शिरले. पोलीस आल्याच दिसताच रोहित आर्यने पोलिसांना त्याच्याकडे असलेल्या एअरगनने गोळी मारली, त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनाही गोळीबार करावा लागला, ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहित आर्य याच्या हाताला गोळी लागली, यानंतर रक्तस्त्राव झाल्यामुळे रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. रोहित आर्य याने मुलांच्या पालकांना धमकीचे व्हिडिओ पाठवले होते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Rohit Arya Encounter: 5 दिवस 100 मुलं आणि एन्काउंटर, सिनेमाला लाजवेल असं प्लॅनिंग, रोहित आर्यानं असं का केलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement