कारवाईची कुणकुण लागताच रविंद्र धंगेकर यांचं नवं ट्विट, अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ravindra Dhangekar: आपल्यावरील कारवाईची कुणकुण लागताच रविंद्र धंगेकर यांनी समाज माध्यमांवर एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवणारी पोस्ट केली आहे.
मुंबई : भाजप नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडून त्यांना निशब्द करणाऱ्या रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात स्थानिक नेत्यांनी तक्रारी केल्याने एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पुणे भाजपच्या नेत्यांनी दबाव आणल्याने आणि देवेंद्र फडणवीस यांनीही सूचना केल्याने युतीच्या धर्मासाठी धंगेकर यांच्यावर हकालपट्टीच्या कारवाईची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. आपल्यावरील कारवाईची कुणकुण लागताच रविंद्र धंगेकर यांनी समाज माध्यमांवर एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवणारी पोस्ट केली आहे.
कात्रजमध्ये घायवळ टोळीने केलेला गोळीबार असो की केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरील जैन बोर्डिंगच्या जागेशी संबंधित कथित भ्रष्टाचाराचे आरोप... शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य करीत आपले इरादे स्पष्ट केले. महायुतीतूनच आरोप होत असल्याने भाजप नेतेही त्रस्त झाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजप नेत्यांनी रविंद्र धंगेकर यांची तक्रार थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यानंतर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेतून धंगेकर यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यानंतर धंगेकर यांनी अन्यायाविरोधात आपला लढा सुरूच राहील, असे सांगताना शिंदे यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
advertisement
शिवसेना हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे.आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे.
आणि…
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 22, 2025
advertisement
अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकनाथ शिंदे यांचं नेहमी पाठबळ राहील
शिवसेना पक्ष वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो..... भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डींगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढविणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील. तुम्ही कितीही कट कारस्थाने केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवी धंगेकर मागे हटणार नाही. सोबत आहेत पुणेकर, लढत राहील धंगेकर..!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 9:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कारवाईची कुणकुण लागताच रविंद्र धंगेकर यांचं नवं ट्विट, अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या...