‘तुम्ही 3300 कोटींची काम करून देखील...’, शरद सोनवणेंनी अजितदादांच्या उमेदवाराची केली पोलखोल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर जुन्नरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) अतुल बेनके विरूद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) सत्यशिव शेरकर यांच्यात थेट लढत आहे. पण मुख्यमंत्री शिंदेंचे नेते शरद सोनवणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अतुल बेनकेंची अडचण होण्याची शक्यता आहे.
रायचंद शिंदे,जुन्नर,पुणे : महायुतीत जुन्नर विधानसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे.त्यामुळे अजित पवारांनी या जागेवरून अतुल बेनकेंना उमेदवारी दिली आहे. तर बेनेकेंविरूद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सत्यशिव शेरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढाई असताना तिकडे शिंदेंने नेते शरद सोनवणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी देखील अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे सोनवणे यांच्या उमेदवारीमुळे बेनकेंचा गेम होण्याची शक्यता आहे.पण हा गेम टाळण्यासाठी आता बेनेक नेमकी काय चाल करतायत? याचा भांडोफोड आता शरद सोनवणे यांनी केला आहे.
खरं तर जुन्नरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) अतुल बेनके विरूद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) सत्यशिव शेरकर यांच्यात थेट लढत आहे. पण मुख्यमंत्री शिंदेंचे नेते शरद सोनवणे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने अतुल बेनकेंची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शरद सोनवणे यांचा काटा काढण्यासाठी आता बेनकेंनी दोन नावात साधर्म्य असलेले शरद सोनवणे मैदानात उतरवल्याचा आरोप शरद सोनवणे यांनी केला आहे.
advertisement
शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पुण्याच्या वाघोलीत अतुल भाऊसाहेब भांबेरे यांनी (शरद सोनवणे) त्याला स्क्रिप्ट लिहून दिली त्याचा बाईट घेतला, त्याचा व्हिडिओ चुकला म्हणून तीन वेळा रिटेक घेतला, याचे व्हिडिओ फुटेज आमच्याकडे आहेत. पण तुम्हाला माहीतीय का हे भांबेरे कोण आहेत? तर भांबेरे हे अतुल बेनके यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत,अशी पोलखोल सोनवणे यांनी केली आहे.
advertisement
तुम्ही 5 वर्ष विद्यमान आमदार राहिला आहात. तुम्ही ३३०० कोटींची काम केली मग तुम्हाला दोन- दोन शरद सोनवणे आणावे लागले, तुमचे कर्मचारी, संचालक त्यांना सूचक होतायत, हे दोन्ही शरद सोनवणे यांनी (बेनके) आयात केलले उमेदवार आहेत, असा भांडाफोड शरद सोनवणे यांनी केला आहे.
तसेच तालुक्यात एकच शरददादा भीमाजी सोनवणे आहे. शरद सोनवणे किती येतील पण बँलेट पेपरवर एकच नाव असेल ते म्हणजे शरददादा भीमाजी सोनवणे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.म्हणून हे पूरावे सादर केल्याचे देखील शरद सोनवणे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Junnar,Pune,Maharashtra
First Published :
Nov 05, 2024 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
‘तुम्ही 3300 कोटींची काम करून देखील...’, शरद सोनवणेंनी अजितदादांच्या उमेदवाराची केली पोलखोल











