'सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो', मुलावरची टीका जिव्हारी; अजितदादांना रोहितच्या वडिलांचे सडेतोड उत्तर

Last Updated:

'भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास',अजित पवारांच्या टीकेवर रोहित पवारांच्या वडिलांनी सडेतोड उत्तर दिले आहे

News18
News18
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कधीही रोहित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. अनेकदा मस्करीत का होईना अजित पवारांनी रोहित पवारांची शाळा घेतली आहे. गावकीकडं लक्ष देताय, भावकीकडं लक्ष द्या. भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास, असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांना टोला लगावला होता. यावर रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. बारामतीत ते बोलत होते.
राजेंद्र पवार म्हणाले, पवार घरण्यात आतापर्यंत सर्वच काकांनी पुतण्याला मदत केली आहे. पवार घराण्याची ही परंपरा आहे. सुरूवातीच्या काळात अजित पवार निवडणूक लढले त्यावेळी माझ्या वडिलांनी म्हणजे रोहितचे आजोबा अप्पासाहेबांनी त्यांना मदत केली. नवख्या माणसाला किती मतदान पडल हे सगळ्यांना माहीत आहे. पण त्यानंतर अजित पवारांनी तब्बल 35 वर्षे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व केले. काहीजण पोस्टल मतांवर निवडून आले असले तरी काळ आणि वेळ बदलते.
advertisement

पवार घराण्यात सगळ्या काकांना पुतण्या दिसतो

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत वडील माझा विचार करतील असे मला वाटले होते. पण आमच्या सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. त्यामुळे माझ्याकडे दुर्लक्ष झाले. त्यांनी माझ्याजागी अजितदादांना संधी दिली. मला तिसऱ्यांदा संधी मिळाली, पण त्यावेळी मला सांगितले गेले की, सर्वांनीच राजकारणात यायचे नसते आणि त्यावेळी मला तो सल्ला पटला.कदाचित त्यावेळी मला माहिती नव्हते की, संधी असते तेव्हा ती खेचून घ्यायची असते. मला कारखान्यावर संधी दिली गेली नाही. कदाचित माझ्या काकांना वाटले असेल की, हा कारखाने काढेल, जळगावला काढेल, मराठवाड्यात काढेल, बारामतीच्या आसपास काढेल. आत्ता मी इथे तुम्हाला एआय तंत्रज्ञानावर बोलण्यास उभा आहे.
advertisement

काय म्हणाले होते अजित पवार?

काही जणांना पहिल्या टर्मलाच वाटतं की मी मोठा झालो पाहिजे. मी पुढं येऊन भाषण केलं पाहिजे. मी माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करत आहे.  पण माझ्या पक्षात काय करावं याचा सल्ला दुसरेच मला द्यायला लागलेत. तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो ना... मगाशी कुणीतरी म्हटलं गावकीकडं लक्ष देताय, भावकीकडं लक्ष द्या. भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास, असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांना टोला लगावला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो', मुलावरची टीका जिव्हारी; अजितदादांना रोहितच्या वडिलांचे सडेतोड उत्तर
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement