माणिकराव कोकाटे आतापर्यंतचे संवेदनशील कृषिमंत्री, सदाभाऊ खोत यांच्याकडून पाठराखण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sadabhau Khot: सातत्याने वादग्रस्त करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पाठराखण करताना इतर मंत्र्यांवर मात्र सदाभाऊ खोत यांनी तोंडसुख घेतले.
कोल्हापूर : माणिकराव कोकाटे हे आतापर्यंतचे सर्वात संवेदनशील कृषिमंत्री असल्याचे सांगत ते इंडियाचे नाही तर भारतातले कृषिमंत्री आहेत, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले. दुसऱ्या बाजूला, सध्याच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा तोरा वाढला आहे. आपल्याच मतदारसंघातील कामातून डोकं वर काढायला या मंत्र्यांना वेळ नाही. मंत्र्यांमधला आणि सरकारमधला बेबनाव अशा गोष्टींमध्ये समोर येतोय, अशा शब्दात त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. सातत्याने वादग्रस्त करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची पाठराखण करताना इतर मंत्र्यांवर मात्र त्यांनी तोंडसुख घेतले.
शरद जोशींनी ज्या विचारांची पेरणी केली तो पुढे घेऊन जाण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आम्हाला पदे मिळाली पण आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही. निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांचा विचार घेऊन जाऊ. काही लोकांना वाटत की माझ्यामुळे सगळे आहे, ढगफुटी माझ्यामुळे झाली. पण सर्वांमुळे सर्व असते हे त्यांना ठाऊक नाही. अनेकांनी चळवळीत जीव ओवाळून टाकला, केसेस घेतल्या, त्यांच्या रक्तातून चळवळ उभी राहिली, असे खोत म्हणाले.
advertisement
शेतकरी चळवळीशी प्रामाणिक आहे
सदाभाऊला पद मिळाले म्हणून बाजूला झाला, असे काहींना वाटते. पण मी शेतकरी चळवळीशी प्रामाणिक आहे. पद मिळवायचे असते तर सदाभाऊंनी बरंच काही केले असते. मुंडे साहेबांच्या घरात बसलो, त्यावेळी माढ्यातून लोकसभेची ऑफर आली होती. त्याचवेळी कमळ हातात घेतले असते तर आज माढ्यातून खासदार असतो, पण संघटनेकडून त्यावेळी लढलो. आम्ही चळवळ आणि कार्यकर्त्यां जपण्याचा प्रयत्न केला, असे खोत म्हणाले.
advertisement
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समज दिली पण सदाभाऊ खोत कृषिमंत्र्यांवर खूश
माणिकराव कोकाटे हे आतापर्यंतचे सर्वात संवेदनशील कृषिमंत्री आहेत. इंडिया नव्हे तर भारतातले कृषिमंत्री असल्याने माणिकराव कोकाटे हे रांगडी भाषेत बोलतात. त्यांना शेतकरी प्रश्नांची जाण आहे, असे सदाभाऊ म्हणाले. शेतकरी आणि सरकारमधील नेत्यांकडून कोकाटे यांच्यावर टीका केली जात असताना सदाभाऊ खोत यांनी मात्र कोकाटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
June 05, 2025 10:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माणिकराव कोकाटे आतापर्यंतचे संवेदनशील कृषिमंत्री, सदाभाऊ खोत यांच्याकडून पाठराखण