सांगलीत मद्यधुंद कारचालकाने पाच जणांना उडवले, कारचा चक्काचूर, घटनेनंतर दगडफेक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sangli Accident: सांगलीत मद्यधुंद कारचालकाने पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे.
आसिफ मुरसल, प्रतिनिधी, सांगली : सांगलीत मद्यधुंद कार चालकाने पाच जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच वाहनधारक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मद्यधुंद कार चालकाची पाच जणांना धडक
मद्यधुंद कारचालक रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील बालाजी मिल रस्त्यावरून भरधाव वेगाने निघाला होता. कारचालक दारूच्या नशेत असल्याने त्याचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने कार आणि दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली.
अपघाताच्या घटनेनंतर मद्यधुंद कार चालकाला चोप, वाहनावर दगडफेक
अपघात इतका भीषण होता की वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी संबंधित वाहनावर दगडफेक केली. त्यानंतर मद्यधुंद वाहन चालकाला संतप्त नागरिकांनी चांगला चोप दिला. दरम्यान या अपघातातील जखमींवर सांगली शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
advertisement
घटनेची पोलिसांत नोंद, अपघाताने सांगली हादरली
संतप्त नागरिकांनी वाहनाचा पाठलाग करत चारचाकी वाहनाची तोडफोड करत बेधुंद चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने सांगली हादरून गेली आहे.
view commentsLocation :
Sangli Miraj Kupwad,Sangli,Maharashtra
First Published :
November 23, 2025 10:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सांगलीत मद्यधुंद कारचालकाने पाच जणांना उडवले, कारचा चक्काचूर, घटनेनंतर दगडफेक


