दिल्लीला जाण्यासाठी सांगलीतून 3 विशेष एक्सप्रेस, असं आहे एकूण नियोजन, सविस्तर माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
दक्षिण-पश्चिम रेल्वेतर्फे दिल्लीला जाण्यासाठी दि.16, 17 व 20 सप्टेंबर रोजी तीन विशेष एक्स्प्रेस सोडण्यात आल्या आहेत. या गाड्या मिरजमार्गे जाणार असल्याने उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना गाडी उपलब्ध झाली आहे. सांगली रेल्वे स्थानकाला यातील दोन गाड्यांचा थांबा मंजूर झाला आहे.
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली : दक्षिण-पश्चिम रेल्वेतर्फे दिल्लीला जाण्यासाठी दि.16, 17 व 20 सप्टेंबर रोजी तीन विशेष एक्स्प्रेस सोडण्यात आल्या आहेत. या गाड्या मिरजमार्गे जाणार असल्याने उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना गाडी उपलब्ध झाली आहे. सांगली रेल्वे स्थानकाला यातील दोन गाड्यांचा थांबा मंजूर झाला आहे.
सांगलीत दोन गाड्यांना थांबा -
म्हैसूर-निजामुद्दीन गाडी (क्र. 06215) व गाडी (क्र. 06585) या दोन्ही गाड्या अनुक्रमे 17 व 18 सप्टेंबरला सकाळी 11: 45 वाजता सांगली स्थानकावर येतील. या गाड्यांची 2 हजार तिकिटे उपलब्ध आहेत.
advertisement
म्हैसूर निजामुद्दीन विशेष एक्स्प्रेस गाडी (क्र. 06505) दि. 16 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हैसूर येथून सुटेल. दि. 17 रोजी सकाळी साडेदहा वाजता मिरजेतून व पुणे येथून सायंकाळी 4:45 वाजता सुटेल. तर निजामुद्दीन येथे दि. 18 रोजी रात्री 11 वाजता पोहोचेल.
advertisement
बेंगलोर निजामुद्दीन एक्स्प्रेस (क्र. 06585) बंगळुरू येथून दि. 17 रोजी सायंकाळी 7 वाजता सुटेल. मिरज येथून दि. 18 रोजी सकाळी साडेदहा वाजता सुटणार आहे. तर सायंकाळी 4:25 वाजता पुणे येथून सुटेल. दि.19 रोजी पहाटे 3:35 वाजता मिरज येथून व सकाळी 8:45 वाजता पुणे येथून सुटेल. दि. 22 रोजी सकाळी 11:30 वाजता निजामुद्दीन येथे पोहोचेल.
advertisement
सांगली रेल्वे सल्लागार समितीचे सल्लागार उमेश शहा काय म्हणाले -
"दिल्लीकडे जाणाऱ्या दोन विशेष रेल्वेंना सांगली स्थानकावर थांबा मंजूर झाला आहे. त्यानुसार सांगली शहर व परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांनी सांगलीतून पुढील प्रवासाचे बुकिंग करावे," असे सांगली रेल्वे सल्लागार समितीचे उमेश शहा म्हणाले आहेत.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
September 17, 2024 1:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
दिल्लीला जाण्यासाठी सांगलीतून 3 विशेष एक्सप्रेस, असं आहे एकूण नियोजन, सविस्तर माहिती