मविआचा जागावाटपाचा वेग कमी, दोन दिवस चर्चा थांबलेली; पटोलेंबद्दल काय म्हणाले संजय राऊत
- Published by:Suraj
Last Updated:
रमेश चेन्निथला आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, आमची चर्चा झाली आहे. थोडे बहुत मतभेद असतात. दोन दिवसापासून चर्चा थांबली होती.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसची तक्रार दिल्लीत केल्यानं मविआत वादाची ठिणगी पडलीय. त्यातच काँग्रेसकडून विदर्भात जागा सोडणार नाही अशी भूमिका घेण्यात आलीय. या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्यात चर्चा झाली आणि थांबलेली चर्चा आजपासून पुन्हा सुरू होईल.
रमेश चेन्निथला यांच्या भेटीनंतर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, आमची चर्चा झाली आहे. थोडे बहुत मतभेद असतात. दोन दिवसापासून चर्चा थांबली होती. ही चर्चा पुन्हा आजपासून सुरू होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आमची नेतेमंडळी उपस्थित असतील. आज रात्री उशिरापर्यंत जागावाटप पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे.
राऊत म्हणाले की, एकूणच जागा वाटपाचा विषय व इतर विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. निवडणुका जाहीर झाल्या मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जो वेग आहे तो कमी आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक बोलवण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत बसून जागा निश्चित करण्याच्या संदर्भात बैठकीत निर्णय झाला आहे. नाना पटोले यांच्याबाबत प्रश्न विचारताच संजय राऊत यांनी म्हटलं की,"महाविकास आघाडीच्या आजच्या जागा वाटपाच्या बैठकीत नाना पटोले देखील उपस्थित असतील. ते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत."
advertisement
ठाकरेंची आणि मविआचीसुद्धा तब्येत ठीक आहे
view commentsमातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची तब्येत ही ठीक आहे आणि महाविकास आघाडीची तब्येत ही ठीक आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप व्यवस्थित होईल. नाना पटोले, संजय राऊत आणि जयंत पाटील चर्चा करतील आणि जागावाटप होईल असं रमेश चेन्निथला यांनी सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 19, 2024 2:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मविआचा जागावाटपाचा वेग कमी, दोन दिवस चर्चा थांबलेली; पटोलेंबद्दल काय म्हणाले संजय राऊत









