Santosh Deshmukh : वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का? 2 दिवसात अटक करा नाहीतर..., मराठा क्रांती मोर्चाचं सरकारला अल्टिमेटम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सात्वन पर भेट घेतली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आबासाहेब पाटील म्हणाले की, कोण आहे वाल्मिक कराड सरकार पेक्षा मोठा आहे का? संविधानाने कायद्यापेक्षा मोठा आहे का?
Santosh Deshmukh Murder Case: सुरेश जाधव, बीड : कोण आहे वाल्मीक कराड सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का? त्याला दोन दिवसात अटक करा, नाहीतर आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल, असा अल्टिमेटम मराठा क्रांती ठोक मोर्चाने महायुती सरकारला दिला आहे. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आता सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढतोय. त्यामुळे आता सरकार बीड प्रकरणावरून काय अॅक्शन घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. या प्रकरणात देशमुख कुटुंबियांच्या अनेक नेते आणि आंदोलनकर्ते भेटून त्यांचं सात्वन करत आहेत.यासोबत या प्रकरणातील मास्टरमाईंडच्या अटकेसाठी सरकारवर दबाव टाकतायत. अशात आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सात्वन पर भेट घेतली आहे.
advertisement
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आबासाहेब पाटील म्हणाले की, कोण आहे वाल्मिक कराड सरकार पेक्षा मोठा आहे का? संविधानाने कायद्यापेक्षा मोठा आहे का? त्याला दोन दिवसात आत नाही टाकला तर पुन्हा आंदोलन करणार, त्यामुळे आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका, असे आबासाहेब पाटील यांनी सरकारला ठणकावुन सांगितलं आहे.
तसेच महाराष्ट्र आणि बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर दोन दिवसात सर्व आरोपी अटक करा, असा अल्टीमेटम त्यांनी सरकारला दिला आहे. 36 जिल्ह्यातील सर्व संघटना मराठा एकत्रित झालेले आहेत.आमचे सरकारला एवढेच म्हणणं आहे. एसपीची बदली करून चालणार नाही, पोलीस प्रशासनाचा जाळ तोडावा लागेल कलेक्टर तहसीलदार हे रॅकेट आहेत तोडलं पाहिजे. त्यामुळे महिन्याच्या आत मर्जीतील्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
December 25, 2024 2:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh : वाल्मिक कराड सरकारपेक्षा मोठा आहे का? 2 दिवसात अटक करा नाहीतर..., मराठा क्रांती मोर्चाचं सरकारला अल्टिमेटम










