Satara Doctor: महिला डॉक्टराच्या मृतदेहाजवळील सुसाईड नोट हॉटेलमधून गायब? बहिणीच्या आरोपाने खळबळ
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
साताऱ्याच्या मृत महिला डॉक्टरच्या बहिणीने खळबळजनक आरोप केला असून तपासावर शंका उपस्थित केली आहे.
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत महिला डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. तसेच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला मानसिक त्रास दिला. आरोग्य विभागातील वरिष्ठ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला.आता मृत महिला डॉक्टरच्या बहिणीने खळबळजनक आरोप केला आहे. माझ्या बहिणीने सुसाईड नोट लिहिली असेल, मात्र पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ती गायब केल्याची शंका बहिणीनी व्यक्त केली आहे,
मृत डॉक्टर तरुणीची बहीण म्हाणाली, आम्हाला ज्या वेळी आत्महत्येची माहिती मिळाली त्यावेळी नातेवाईक पहाटे ३ वाजता घटनास्थळी पोहचले. तर तिचा मृतदेह आमच्या परवानगीशिवाय हॉटेलमधून हॉस्पिटलमध्ये आणला होता. त्यामुळे आम्हाला संशय आहे की काही पुरावे नष्ट केले आहेत. तिने चौकशी समितीला चार-पाच पानांचे पत्र लिहिले त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तिने सुसाईड नोट लिहिली असावी.
advertisement
माझ्या बहिणीचा मर्डर आहे, मृत डॉक्टरच्या बहिणीचा आरोप
एवढच नाही तर मृत डॉक्टरच्या बहिणीने ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचे म्हटले आहे. डॉक्टर महिलेची बहीण म्हणाली, माझी बहीण खूप स्ट्राँग होती. 80 ते 90 पोस्टमार्टम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? ती असे करूच शकत नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, केवळ हातावरच्या नोटवर न जाता या पत्राकडे पहावं. दीड ते दोन हजार एमएससी केलेले आहेत ती कशी कमकुवत असू शकते तिला मरणासाठी भाग पाडले आहे. हा मर्डर आहे.
advertisement
मागील महिन्यात बहिणीसोबत झालं बोलणं
पीडित डॉक्टर मुलीची बहीण पुढे म्हणाली की, मागील महिन्यात माझं तिच्याशी बोलणं झालं. पोस्टमार्टमसाठी मला दबाव येत आहे. अनफिट असेल तर फिट म्हणून दाखवण्यासाठी दबाव होता. याला नकार दिल्यामुळे त्रास वाढत गेला. पाच पानाचं आम्ही पत्र दिले. त्याची चौकशी झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तिने माहितीचा अधिकार देखील दिला होता
advertisement
एका आरोपीला अटक एक फरार
या प्रकरणी प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 24 तासांनी बनकर याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी PSI गोपाळ बदने हा 24 तासांनतरही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
October 25, 2025 4:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara Doctor: महिला डॉक्टराच्या मृतदेहाजवळील सुसाईड नोट हॉटेलमधून गायब? बहिणीच्या आरोपाने खळबळ


