फुफ्फुसात दुधाची उलटी अडकली अन् 20 दिवसांची चिमुकली जिवानिशी गेली; डाॅक्टर म्हणतात...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कराड तालुक्यातील तळबीड येथे वेदिका संताजी कांबळे या 20 दिवसांच्या बाळाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. आई स्तनपान करत असताना अचानक बाळाला उलटी झाली आणि ती...
सातारा : कराड तालुक्यातील तळबीड येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. आई स्तनपान करत असताना एका अवघ्या 20 दिवसांच्या चिमुकलीचा उलटी फुफ्फुसात अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना बुधवार, दि. 6 रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.
दुधासोबत उलटी अडकली
वेदिका संताजी कांबळे (वय-20 दिवस) असे मृत बाळाचे नाव आहे. मूळची कोडोली पारगाव, ता. हातकणंगले येथील कांबळे कुटुंब सध्या तळबीड येथील भुईंगल्लीत राहते. तळबीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिकाची आई अंकीता तिला स्तनपान करत होती. त्याचवेळी चिमुकलीला उलटी झाली आणि ती तिच्या फुफ्फुसांमध्ये अडकली. वेदिकाला अचानक त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला तात्काळ कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
advertisement
डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
आपल्या तान्ह्या मुलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. रुग्णालयासमोर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद कॉटेज हॉस्पिटलचे डॉ. तुषार नाळे यांनी तळबीड पोलीस ठाण्यात दिली आहे.
या संदर्भात डॉक्टरांनी मातांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत
- बाळाच्या फुफ्फुसात उलटी अडकू नये, यासाठी आईने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
- बाळाला दूध पाजल्यानंतर त्याला काही वेळ सरळ स्थितीत ठेवावे.
- तसेच त्याला थोडेसे उंच उशीवर किंवा मांडीवर ठेवून पाठीवरून थोपटल्यास उलटी होण्याची शक्यता कमी होते.
- दूध पाजल्यानंतर बाळाला 'ढेकर' काढायला लावणे खूप महत्त्वाचे असते.
advertisement
हे ही वाचा : Nashik: राखी बांधायची राहून गेली, शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरड्यांना चिरडूनच टेम्पो थांबला, 2 ठार
हे ही वाचा : साताऱ्यातही 'लेझर'ला पूर्ण बंदी! गणेशोत्सवात मर्यादेत ठेवायचा 'डीजे'चा आवाज, अन्यथा होणार थेट कारवाई
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2025 8:08 AM IST
मराठी बातम्या/सातारा/
फुफ्फुसात दुधाची उलटी अडकली अन् 20 दिवसांची चिमुकली जिवानिशी गेली; डाॅक्टर म्हणतात...