ज्या वास्तूत लिहिला गेला मराठ्यांचा सुवर्ण इतिहास, ती आजही आहे दिमाखात; कुठं माहितीये?
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास ग्रँट डफ यांनी लिहिला आहे. या वास्तूमध्ये ते वास्तव्याला होते.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेला सातारा जिल्हा आजही त्या धगधगत्या इतिहासाची आठवण करून देतो. इथं अनेक प्राचीन मंदिरं आहेतच, शिवाय इथल्या प्रत्येक प्राचीन वास्तूच्या अगदी चराचरात इतिहासाचा अंश आढळतो. एका वास्तूत तर मराठ्यांचा संपूर्ण इतिहास लिहिला गेलाय.
कॅप्टन जेम्स ग्रॅंट डफ हे मराठ्यांचे इतिहासकार म्हणून ओळखले जातात. मराठ्यांचं राज्य संपुष्टात आल्यानंतरच्या काळात सातारला ग्रॅंट डफ यांनी प्रशासकीय कार्य करत असतानाच मराठ्यांचा इतिहास लिहायचं ठरवलं. हा इतिहास लिहिण्यासाठी साधनसामग्री गोळा करताना अनेक अडचणी आल्या. मराठी, उर्दू, इंग्रजी, इत्यादी अनेक भाषांवर ग्रॅंट डफ यांचं उत्तम प्रभुत्त्व होतं. 1818 साली त्यांची पॉलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती झाली होती. त्यासाठी 1822पर्यंत ते साताऱ्यातील पवई नाका परिसरात असलेल्या बंगल्यात वास्तव्याला होते. याच बंगल्यात बसून त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. त्यासाठी सातारचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले थोरले यांनी आपल्याकडील सर्व ऐतिहासिक दस्तऐवज देऊन त्यांना हा इतिहास लिहिण्यास मदत केली होती.
advertisement
ज्या वास्तूत हा इतिहास लिहिला गेला ती 1818 सालची वास्तू आज 2024 सालीही अत्यंत दिमाखात उभी आहे. 'अ हिस्टरी ऑफ द मराठाज' या ग्रंथाची सुवर्ण पानं ग्रँट डफ यांनी याच वास्तूत बसून लिहिली, त्यातूनच पुढं मराठ्यांचा इतिहास जगभरात प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ छापण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु जर पुस्तकाचं नाव बदलून 'मुघल सत्तेचा ऱ्हास आणि ब्रिटिश सत्तेचा उदय' असं नामकरण केलं तरच पुस्तक छापून मिळेल अशी अट ब्रिटिश पब्लिशर कंपनीनं घातली होती. याला स्पष्ट नकार देऊन ग्रँट डफ यांनी 1826 साली स्वखर्चातून 'हिस्टरी ऑफ द मराठाज' या शिक्षकानंच पुस्तक छापून प्रकाशित केलं.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास ग्रँट डफ यांनी लिहिला आहे. ज्या वास्तूमध्ये ते वास्तव्याला होते. ती वास्तू आता मोडकळीस आली असली तरी सध्या या वास्तूचा ताबा पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडे आहे. परंतु अनेकजण या वास्तूला भूत बंगला, पडकं घर, असं म्हणतात जे वाईट आहे. कारण अनेक लेखकांना, इतिहास अभ्यासकांना या वास्तूनं प्रेरणाच दिलीये. त्यामुळे या वास्तूचं संवर्धन व्हावं आणि आणखी इतिहासप्रेमींपर्यंत तिची माहिती पोहोचावी, असं मत इतिहास अभ्यासक घनश्याम राणे यांनी व्यक्त केलं.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
June 25, 2024 8:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
ज्या वास्तूत लिहिला गेला मराठ्यांचा सुवर्ण इतिहास, ती आजही आहे दिमाखात; कुठं माहितीये?

