Satara News : अतिवृष्टीमुळे चारा पिकाचे नुकसान, कोरेगावातील बळीराजा हवालदिल, धक्कादायक परिस्थिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वञ सुरू झालेल्या पावसामुळे खरीपातील पिकांना जीवदान मिळाले आहे.परंतु गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने काही भागात पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी परिस्थितीमुळे बहुतांशी ठिकाणी प्रतिकुल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडण्याआधी अनेक दिवस दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर होतं आणि आता अतिवृष्टीमुळे चार
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे चारा पिकाचे नुकसान झाला आहे. यामुळे कोरेगावातील बळीराजाच्या हवालदिल झाला आहे. मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
गेले काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र सुरू झालेल्या पावसामुळे खरीपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने काही भागात पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी परिस्थितीमुळे बहुतांशी ठिकाणी प्रतिकुल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
पाऊस पडण्याआधी अनेक दिवस दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर होते. त्यात आता अतिवृष्टीमुळे चारा पिकांसोबत अतिरिक्त पाणी सहन न होणाऱ्या पिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दूध विक्रीतून कुठंच जात नाही लाखाचा नफा! सोलापूरच्या शेतकऱ्यानं करून दाखवलंय
कोरेगाव तालुका उत्तरेकडील परिसरात खरीप हंगामातील पिके वाढीच्या फुलधारणेच्या अवस्थेत आहेत. पावसामुळे खरीपांच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, पावसाचा वाढता जोर याच पिकांसाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
advertisement
अतिवृष्टीमुळे चारा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करत वाढविलेले मक्याचे पीक पाऊस आणि वाऱ्यामुळे भुईसपाट झाले आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर भविष्यातही मोठ्या प्रमाणावर सुक्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
advertisement
दरम्यान, आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास त्याचा फटका खरीपातील घेवडा, वाटाणा पिकांना होण्याची भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. पिंपोडे बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणावर घेवड्याचे पिक घेतले जाते. घेवडा हे पीक संवेदनशील असून पाण्याचा ताण व अतिरिक्त पाणी याचा प्रतिकूल परिणाम घेवडा पिकावर होतो. त्यामुळे सद्यस्थितीतील पावसाचा जोर कायम राहिल्यास त्याचा प्रतिकुल परिणाम खरीप पिकावर होण्याची संभाव्यता आहे.
advertisement
Location :
Satara,Maharashtra
First Published :
August 01, 2024 1:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara News : अतिवृष्टीमुळे चारा पिकाचे नुकसान, कोरेगावातील बळीराजा हवालदिल, धक्कादायक परिस्थिती