अस्सल मराठमोळी चव, सातारची पाणीपुरी एकदम भारी, उलाढाल लाखोंची!

Last Updated:

सातारकरांना काय आवडेल, त्यांच्या आवडीची चव कोणती, याचा त्यांनी अभ्यास केला, अर्थात या पाणीपुरीच्या सातारकर जणू प्रेमातच पडले आहेत.

+
पाणीपुरीच्या

पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत आहे 30 रुपये.

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : 'पाणीपुरी' म्हणजे खवय्यांचा ऑल टाइम फेव्हरिट पदार्थ. भारतात सगळीकडे पाणीपुरी आवडीनं खाल्ली जाते. परिणामी अगदी लहानसा व्यवसाय असला तरी पाणीपुरी विक्रेते त्यातून दिवसाला हजारो रुपयांची कमाई करतात. आतापर्यंत आपण उत्तर प्रदेशातील नागरिकांनाच पाणीपुरीचा व्यवसाय करताना पाहिलं असेल परंतु आता मराठी माणसंसुद्धा या व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळवू लागले आहेत.
advertisement
साताऱ्यात अनेक ठिकाणी मराठी माणसं पाणीपुरीचा व्यवसाय उत्तमरित्या सांभाळतात. इथल्या राजवाडा परिसरात मोहन पाणीपुरी सेंटर प्रचंड लोकप्रिय आहे. प्रवीण पाटील आणि सुनीता पाटील या दाम्पत्याचा हा व्यवसाय. प्रवीण पाटील यांनी 3 वर्षांपूर्वी मोहन पाणीपुरी सेंटर सुरू केलं. आपल्या आजोबांच्या नावानं सुरू केलेल्या त्यांच्या या पाणीपुरीला सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिलाय. इथल्या पाणीपुरीची चव, पाणीपुरी सेंटरमधली स्वच्छता, पाणीपुरी देणाऱ्या वर्कर्सचे ड्रेस कोड, पाणीपुरी देताना हातात हॅन्ड ग्लोज घालणं, असा सगळा बारीकसारीक विचार करून प्रवीण पाटील हे पूर्ण तयारीनिशी या व्यवसायात उतरले. परिणामी त्यांच्या कष्टाचं चीज झालं. सातारकरांना काय आवडेल, त्यांच्या आवडीची चव कोणती, याचा त्यांनी अभ्यास केला, अर्थात या पाणीपुरीच्या सातारकर जणू प्रेमातच पडले आहेत.
advertisement
प्रवीण पाटील हे सुरुवातीला फक्त थंड पाणीपुरी विकायचे पण आज मोहन पाणीपुरी सेंटरवर 2 प्रकारच्या पाणीपुरी मिळतात एक थंड पाण्यातली पाणीपुरी जिला नाव दिलंय 'मोहन का पंच' आणि दुसरी गरम रगड्यातली पाणीपुरी जिला नाव दिलंय 'दिलखुश पाणीपुरी'. सध्या या दोन्ही पाणीपुऱ्यांनी सातारकरांच्या मनावर राज्य केलंय. कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी सिनेस्टार सेलिब्रिटी मोहन पाणीपुरी सेंटरमध्ये पाणीपुरी खायला येतात. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण ही पाणीपुरी मोठ्या चवीनं खातात.
advertisement
मोहन पाणीपुरी सेंटर, सातारा
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी उद्योजकसुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय यशस्वीरित्या करू शकतात, याचं प्रवीण पाटील हे उत्तम उदाहरण आहेत. ते दिवसाला 700 ते 1500 प्लेट पाणीपुरी विकतात. त्यातून दररोज हजारोंची, तर महिन्याला लाखो रुपयांची कमाई होते. पाणीपुरीच्या एका प्लेटची किंमत आहे 30 रुपये आणि 1 प्लेट शेवपुरी मिळते 40 रुपयांना. त्याचबरोबर इथं चाट, भेळ, सँडविच, रगडापुरी, बर्गर, दाबेली हे उत्तम चवीचे पदार्थही मिळतात.
advertisement
दरम्यान, मराठी उद्योजक यशस्वीरित्या व्यवसाय करू शकतो. व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा असेल तर छोट्या व्यवसायातूनही दररोज हजारो रुपये कमवता येऊ शकतात, असं प्रवीण पाटील यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
अस्सल मराठमोळी चव, सातारची पाणीपुरी एकदम भारी, उलाढाल लाखोंची!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement