Satara News : 25 वर्षांची मेहनत, गजरे विकून बनला लखपती, एका सीजनमध्ये होते इतकी कमाई, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
धीरज घाडगे हे मागील 25 वर्षांपासून मोती चौक येथे गजऱ्याचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी आठाणे, 1 रुपयापासून गजऱ्याच्या विक्रीला सुरुवात केली होती. जसजशी महागाई वाढत गेली, शेतजमीन कमी होत गेली, तसतसे गजऱ्याचे आणि इतर भाव वाढत गेले.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : गजरा घालण्यासाठी वयाची अट नसते, कितीही वय असू दे, स्त्रियांना फुले आणि त्यांचे गजरे हे अत्यंत प्रिय असतात. एखादा सण-समारंभ, पूजा असेल किंवा कोणताही धार्मिक विधी, आनंद सण उत्सवात तर महिला आपल्या केसांमध्ये हमखास गजरे माळतात. त्याच गजऱ्याची विक्री करून साताऱ्याचा गजरे वाला लखपती झाला आहे. धीरज घाडगे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते साताऱ्यातील मोती चौक येथे मागील 25 वर्षांपासून गजऱ्याची विक्री करत आहेत. याचबाबत लोकल18 ने घेतलेला हा आढावा.
advertisement
लग्नसमारंभ, वाढदिवस किंवा कोणताही सणासुदीचा कार्यक्रम असू दे, त्याचबरोबर अगदी काही विशेष नसेल आणि रस्त्यावर सुंदर फुले, गजरे, वेण्या घेऊन बसलेली बाई, किंवा पुरुष दिसली आणि त्या फुलांचा मोहक सुगंध आला की आपोआप स्त्रियांची पावले त्या फुलांच्या दिशेने वळतात. मग पटकन एखादा मोगऱ्यांच्या फुलांचा सुवासिक घमघमाट असणारा सुंदर गजरा खरेदी करून, उभ्या केसांमध्ये मळण्याचा मोह स्त्रिया पूर्ण करतात. याच गजऱ्याची विक्री करत एक व्यक्ती लखपती झाला आहे.
advertisement
धीरज घाडगे हे मागील 25 वर्षांपासून मोती चौक येथे गजऱ्याचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी आठाणे, 1 रुपयापासून गजऱ्याच्या विक्रीला सुरुवात केली होती. जसजशी महागाई वाढत गेली, शेतजमीन कमी होत गेली, तसतसे गजऱ्याचे आणि इतर भाव वाढत गेले. सध्या गजऱ्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. 12 इंचाचा म्हणजे एक फुटाचा गजरा हा 20 रुपये ते 25 रुपयांना मिळत आहे.
advertisement
4 महिन्याच्या सीझनमध्ये किती कमाई -
पंढरपूर मार्केटमधून मोठ मोठ्या सणांना गजराच्या किमती वाढतात. त्यामुळे 10 रुपये, 12 रुपये होलसेल दराने खरेदी करून ग्राहकांना कधी 15 कधी 20 तर कधी 25 रुपयांपर्यंत गजऱ्याची विक्री केली जाते. मोती चौकामध्ये 8 तर बस स्टँड परिसरात 8 जण गजरेविक्रीचा व्यवसाय करुन आपली उपजीविका भागवत आहेत. लग्नसमारंभ, वाढदिवस, दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्री, पाडवा या सणांमध्ये मोगऱ्याच्या गजऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे पाहायला मिळते आणि या चार महिन्यात हे व्यवसायिक गजरे विकून लाखो रुपये कमावतात. व्यवसाय असल्याने व्यवसायामध्ये चढ-उतार होत असतो. अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांपर्यंत उलाढाल सीझनमध्ये होत असते.
advertisement
Kolhapur : मानाचा प्रथम गणपती! जिवंत वाघ अन् अस्वल आणण्यापासून ते समाजप्रबोधन, 150 वर्षांची अनोखी परंपरा, VIDEO
त्याचबरोबर सीझनमध्ये आम्ही स्वतःहून पैसे वाढवत नसतो, ग्राहकांची मागणी वाढते, त्यामुळे मार्केटमधूनच गजऱ्याची किंमत वाढवली जाते. त्यामुळे आम्हाला ग्राहकांना जास्त पैशांमध्ये गजऱ्याची विक्री करावी लागते, अशी माहिती गजरे व्यावसायिक धीरज घाडगे यांनी दिली.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
September 11, 2024 2:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara News : 25 वर्षांची मेहनत, गजरे विकून बनला लखपती, एका सीजनमध्ये होते इतकी कमाई, VIDEO