Satara Crime : तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल; साताऱ्यात संतप्त नातेवाईकांचा रास्तारोको
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Satara Crime : अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा. आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करत केला रास्तारोको.
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या आठवडाभरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची 8 ते 10 प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या सुरक्षेची चिंता सतावत आहे. ह्या घटना ताज्या असतानाच आता साताऱ्यातील एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
साताऱ्यात एका अल्पवयीन मुलीने तरुणाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. यानंतर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे. मात्र, आज साताऱ्यातील पोवई नाक्यावर मुलीच्या नातेवाईकासह काही लोक एकत्र आल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस आणि नातेवाईक यांच्यामध्ये झटापट देखील झाली. मात्र, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यात घेऊन सर्व बाजू समजावून घेतली.
advertisement
वाचा - कोमल निघाली बेवफा! 5 वरांशी केले लग्न, हनिमूनही साजरा केला पण.. राज्यात खळबळ
काही दिवसापासून संशयित आरोपी हा मुलीला वारंवार त्रास देत होता. त्या त्रासाला कंटाळून या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी या तरुणाचा विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या तरुणावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आले होती. मात्र, काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता झालेल्या या तरुणाने पुन्हा या मुलीला आणि तिच्या घरातल्या लोकांना धमकी दिल्याने या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
August 25, 2024 4:03 PM IST
मराठी बातम्या/सातारा/
Satara Crime : तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल; साताऱ्यात संतप्त नातेवाईकांचा रास्तारोको


