...तर महायुतीत राहून फायदा काय? आमदाराचा अजितदादांना थेट सवाल

Last Updated:

अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अजित पवार आणि आमदार दीपक चव्हाण
अजित पवार आणि आमदार दीपक चव्हाण
फलटण : महायुतीतील घटक पक्षांनी नेहमीच आम्हाला सापत्नपणाची वागणूक दिली. केवळ आमदारांना नाही तर आमच्या पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अजित पवार यांनाही सापत्नपणाची वागणूक देण्यात येत आहे. आमचे एकही काम घटक पक्षाच्या मंत्र्यांनी केले नाही. जर कामेच होत नसतील आणि सन्मान मिळत नसेल तर मग त्या सत्तेत राहून फायदा काय? असा थेट सवाल फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी केला.
अजित पवार यांच्या पक्षाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाला स्वत: शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेते उपस्थित आहेत.
advertisement
आमची कोणतीही कामे महायुतीतील घटक पक्षांच्या मंत्र्यांनी केली नाहीत, मग महायुतीत राहून फायदा काय?
अजित पवार यांची साथ सोडल्याबाबत भूमिका मांडताना दीपक चव्हाण म्हणाले, खरे तर आम्हाला महायुतीत करमतच नव्हते. पण नेत्याने (अजित पवार) निर्णय घेतला होता. म्हणून आम्हाला जावे लागले. शेवटी जनतेच्या प्रश्नांना महत्व असते. परंतु आमची कोणतीही कामे महायुतीतील घटक पक्षांच्या मंत्र्यांनी केली नाहीत. आम्हाला सन्मान मिळाला नाही. नाईलाजाने आम्ही महायुतीत राहिलो.
advertisement
आता फलटणमध्ये तुतारी वाजवायचीच, शरद पवारांचे हात बळकट करायचे, आमदार दीपक चव्हाण यांचा निर्धार
आम्हाला तिकडे अजिबात करमत नव्हते. सगळ्या चुकीच्या गोष्ठी महायुतीत घडत होत्या. परंतु हे अजितदादांच्या अजून का लक्षात येत नाही, याची मला कल्पना नाही. झाले गेले जाऊ द्या. आता पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी तुतारी हाती घेतली आहे. पक्षस्थापनेपासून मी पक्षाचे काम करतो आहे. पक्षाने मला संधी दिली. आता शरद पवारांचे हात बळकट करायचे आहेत. आता फलटणमध्ये तुतारी वाजवायचीच, असा निर्धार दीपक चव्हाण यांनी बोलून दाखवला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
...तर महायुतीत राहून फायदा काय? आमदाराचा अजितदादांना थेट सवाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement