Maharashtra Elections Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंची ऑफर, वंचित विसर्जित करा अन्...

Last Updated:

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे.

विधानसभा निवडणुकीआधी आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर
विधानसभा निवडणुकीआधी आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर
सचिन जाधव,  सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकांवरील महाविकास आघाडी यांच्यात लढत असली तरी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही छोटे पक्ष तिसरी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली आहे. आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना ऑफर देताना वंचित बहुजन आघाडी पक्ष विसर्जित करण्याची मागणी केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (RPI) स्थापना दिनानिमित्ताने रामदास आठवले साताऱ्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना आरपीआयमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले.
रामदास आठवले यांची ऑफर
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले की, प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआयसोबत यावे. ते आल्यास मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे आवाहन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले.
advertisement
आरपीआयची 10 जागांची मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला 8 ते 10 जागा मिळाव्यात अशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मागणी केली आहे. राज्यात महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला 8 ते 10 मिळाव्यात असे आठवले यांनी म्हटले.
महायुतीमध्ये आम्हाला गृहीत धरून काम करू नका: रामदास आठवलेंचा इशारा
राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून येतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. राज्यात महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा देखील रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिला. मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार येते अशी मिश्किल टिप्पणी देखील रामदास आठवले यांनी केली.
advertisement
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समान नागरी कायदा आणणार असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत बोलताना रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी कायदा आला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Maharashtra Elections Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना रामदास आठवलेंची ऑफर, वंचित विसर्जित करा अन्...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement