सातारकर पाणी जपून वापरा! ऐन पावसाळ्यात शुक्रवारपासून पाणीकपात
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
कास व शहापूर पाणी योजनांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने 16 ऑगस्टपासून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
सातारा: गेल्या काही दिवसांत धो धो पावसानं हैराण झालेल्या सातारकरांना पाणीटंचाईला सामोरं जाव लागणार आहे. शहरात शुक्रवारपासून पाणी कपात होणार असून त्यामुळे पाणी जपून वापरावं लागणार आहे. कास व शहापूर पाणी योजनांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने 16 ऑगस्टपासून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक पेठेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात केली जाणार आहे.
शहापूर योजनेसाठी महावितरणच्या शेंद्र उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. हा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड होऊन शहापूरचा पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. तर कास योजनेच्या नवीन जलवाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र, जुन्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहे. त्यामुळे कासमधूनही पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नाही.
advertisement
दरम्यान, शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने वीजपुरवठ्यातील दोष दूर करून जलवाहिनीची गळती काढण्याचे काम केले जाणार आहे. या कामामुळे कास आणि शहापूर योजनेच्या पाणीपुरवठ्यात आठवड्यातून एक दिवस कपात केली जाणार आहे. पालिकेने याबाबत वेळापत्रक तयार केले असून 16 ऑगस्टपासून पाणीकपात सुरू होणार आहे.
पाणी कपतीचे वेळापत्रक
कास योजना
सोमवार: भैरोबा टाकी, मंगळवार: व्यंकट पुरा टाकी, बुधवार: कात्रे वाडी टाकी आणि घटेवाडी, गुरुवार: गोल टाकी मेन लाईन (निळी, दुसरा झोन सकाळी सात ते आठ), शुक्रवार: मेन लाईन गोल टाकी ( निळी पहिला झोन) सकाळी सहा ते सात, शनिवारी: कोटेश्वर टाकी, रविवारी: कोपरी लाईन, गुजर आळी लाईन गुरुकुल टाकी
advertisement
शहापूर योजना
view commentsसोमवार: यशवंत गार्डन टाकी, मंगळवार: घोरपडे टाकी, बुधवार: गणेश टाकी, गुरुवार: राजवाडा टाकी, शुक्रवार: गणेश टाकी, शनिवार: सकाळ सत्र, देवी चौक घांटवरी, रविवार: घोरपडे टाकी (सकाळ सत्र)
Location :
Satara,Maharashtra
First Published :
August 14, 2024 9:18 AM IST


