रागाने लालबुंद चेहरा, उदयनराजे संतापले, बदलापूर एन्काऊंटरवर काय म्हणाले?

Last Updated:

Badlapur Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला.

उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले
सातारा : आरोपीचे वकीलपत्र स्वीकारले जात असेल आणि त्यातून तो निर्दोष होता असे सांगण्याचा प्रयत्न केले जात असेल तर काय बोलायचे? लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. न्याय मिळत नसेल तर लोक काय करणार? मी तुमचे टीव्ही वगैरे बघणे सोडून दिले आहे. न्याय कोणाकडे मागायचा? लोकप्रतिनिधी, न्यायालय, पोलीस कोणाकडे जायचे? अशी प्रतिक्रिया बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपीच्या एन्काऊंटरवर खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मात्र या प्रकरणातील शाळा चालकांसह अन्य आरोपी फरार किंबहुना मोकाट असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विधानसभा निवडणूक लढविण्याची स्वरा भास्करच्या नवऱ्याची तयारी, महाविकास आघाडीकडे तिकीट मागितले
ते म्हणाले, अशा गुन्हेगारांना तुडवून मारले पाहिजे. सत्ताधारी विरोधक मला देणेघेणे नाही. ह्यांच्या कुटुंबाबरोबर झालं असतं कर काय केलं असतं बोलले असते का? ज्या कुटुंबाला त्या परिस्थितीला सामोरे जायला लागते, त्यालाच कळते. म्हणून मी प्रत्येक वेळी संबंधित परिस्थिती जर माझ्यावरच असती तर.. असा विचार करूनच मी बोलत असतो. कालची घटना फार सहज झाली. गोळ्या घालून मारण्यापेक्षा त्यांना जनतेत सोडायला पाहिजे होते, तुडवून मारले पाहिजे होते, अशी संतापजनक प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली.
advertisement
उदयनराजे संतापले
मला आश्चर्य वाटते लोकांना (विरोधकांना) समजत कसे नाही? हेच आपल्या कुटुंबासोबत घडले असते तर प्रतिक्रिा काय असती? आरोपीटे वकीलपत्र स्वीकारले जाते, त्यातून त्याला निर्दोष दाखविण्याचे प्रयत्न केले जातात. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा, पोलिसांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. न्याय मिळत नसेल तर लोक काय करणार? असे उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे भोसले यांची सरकारकडे मोठी मागणी
गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की, त्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजेत. त्यासाठी कायद्यात बदल करा. रेप केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.
advertisement
समाजमनांत असुरक्षितता आहे. कसाबने निष्पाप लोकांना मारले. करोडो रुपये त्याच्यावर खर्च केले. दुसऱ्या देशात असता तर त्याला गोळ्या घालून मारले असते. दुसऱ्या देशांत आणि आपल्या देशात हा फरक आहे. सत्ताधारी विरोधक याचे मला देणे घेणे नाही. त्यांच्यासोबत असे झाले असते तर काय केले असते? असा विचारणा त्यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
रागाने लालबुंद चेहरा, उदयनराजे संतापले, बदलापूर एन्काऊंटरवर काय म्हणाले?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement