VIDEO : योद्धा 85 वर्षाचा झाला! दिल्लीत शरद पवारांनी तलवारीने केक कापत वाढदिवसाचे केलं सेलिब्रेशन
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे.या वाढदिवशी शरद पवारांनी दिल्लीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला आहे.
Sharad Pawar Birthday Celebration : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे.या वाढदिवशी शरद पवारांनी दिल्लीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला आहे.या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या या दिल्लीतील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनआधी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. तब्बल अर्धा तास ही भेट झाली होती. या भेटीत अजित पवारांसह इतर नेत्यांनी पवारांना भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची माहिती आहे. तसेच या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार, शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार, पत्नी खासदार सुनेत्रा पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, पार्थ पवार आदीदेखील शरद पवारांची भेट घेतली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे दिल्लीत आहेत. अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता पवार कुटुंबातील वितुष्ट कमी होतील का, याची चर्चा सुरू झाली आहे.
view commentsLocation :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
December 12, 2024 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : योद्धा 85 वर्षाचा झाला! दिल्लीत शरद पवारांनी तलवारीने केक कापत वाढदिवसाचे केलं सेलिब्रेशन


