NCP : जळगाव दौऱ्यात शरद पवारांचा भाजपला धक्का, जुन्या शिलेदाराचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
- Published by:Shreyas
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय नाट्यानंतर शरद पवार जळगाव दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात शरद पवारांच्या गळाला भाजपचा नेता लागला आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव, 5 सप्टेंबर : अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभाग नोंदवल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये राजकीय नाट्य घडलं. अजितदादांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार शपथ घेतलेल्या आमदारांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. याआधी शरद पवारांनी छगन भुजबळांचा येवला, हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये सभा घेतली. यानंतर अनिल पाटील यांच्या जळगावमध्ये शरद पवार आले. शरद पवारांच्या जळगाव दौऱ्यात भाजपच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
advertisement
भाजप नेते आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी भाजपची साथ सोडली आहे. भाजपच्या नवीन विचारसरणीसोबत आमची नाळ जुळत नाही. भाजपमध्ये मला कुणाला दोष द्यायचा नाही, असं कारण सांगत बी.एस.पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. शरद पवार साहेबांचे विचार आवडले, ते पक्षासाठी घेत असलेली मेहनत आवडली, त्यामुळे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये जात असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
advertisement
गेल्या 25-30 वर्षांपासून कार्यकर्ता होतो. लालकृष्ण अडवाणी, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमची विचारांशी नाळ होत, पण भाजपची नवीन विचारसरणी आमच्यासारख्या लोकांना आवडत नाही, अशी खंतही बी.एस.पाटील यांनी व्यक्त केली. शरद पवारांचे जे विचार आहेत, ते जे परिश्रम घेत आहेत, ते मला आवडलं, त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश करावासा वाटला, असं बी.एस.पाटील म्हणाले.
advertisement
बी.एस.पाटील 1995 पासून तीन वेळा आमदार होते, पण त्यानंतर भाजपने तिकीट नाकरल्यानंतर पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बी.एस.पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, यानंतर ते 2014 साली पुन्हा ते भाजपमध्ये आले आणि आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 05, 2023 4:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP : जळगाव दौऱ्यात शरद पवारांचा भाजपला धक्का, जुन्या शिलेदाराचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश









