Shirdi News : दोन मर्डरनंतर 48 तासात दोन मोठे निर्णय, शिर्डी साई संस्थान ऍक्शन मोडमध्ये!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शिर्डी साई संस्थानने दोन दिवसांमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शिर्डी साई संस्थानने दोन दिवसांमध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय काल घेण्यात आला होता, त्यानंतर आता आज मोफत प्रसाद भोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात आता टोकन पद्धतीने मोफत जेवण मिळणार आहे.
advertisement
साई प्रसादालयात मोफत भोजनासाठी भाविकांना कुपन मिळणार आहेत. साईबाबांच्या दर्शनानंतर रांगेत उदी काऊंटरवर कुपन वितरित करण्यात येणार आहेत. तसंच संस्थानच्या भक्त निवासातही भोजनासाठी कुपन दिले जाणार आहेत. शिर्डीमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी मंदिर संस्थानाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
साई प्रसादालयात रोज 50 ते 60 हजार भाविक मोफत भोजनाचा लाभ घेतात. पण प्रसादालयात जेवणासाठी आता कूपन आवश्यक आहे. दुहेरी हत्याकांड तसंच सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे. याआधी मोफत जेवणासाठी प्रसादालयात थेट प्रवेश होता, पण वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
गुरूवार म्हणजेच उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
सुजय विखेंच्या वक्तव्याने वाद
काहीच दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील मंदिरात मिळणाऱ्या जेवणाबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. टअख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय, महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा झालेत', असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं होतं. साई संस्थानच्या प्रसादालयाच्या अन्नदानात जे पैसे जातात ते आमच्या मुलांच्या मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा. शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आले, मात्र तेथे चांगले शिक्षक नाहीत, इंग्लिश विषय शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही, इंग्लिश विषयाचा शिक्षक मराठीत इंग्लिश शिकवतोय, याचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
February 05, 2025 8:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi News : दोन मर्डरनंतर 48 तासात दोन मोठे निर्णय, शिर्डी साई संस्थान ऍक्शन मोडमध्ये!