Shirur Accident VIDEO: पोळ्याच्या मिरवणुकीत उधळलेल्या बैलांनी 2 चिमुकल्यांना चिरडलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पिंपळे जगताप येथे बैलपोळ्याच्या मिरवणुकीत बैल उधळले, दोन चिमुरड्यांना किरकोळ दुखापत झाली. गावकऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, पुढील वर्षी सुरक्षा वाढवणार.
सचिन तोडकर, प्रतिनिधी शिरुर: घटस्थापनेआधी अघाटीत घडलं, बैल पोळ्याच्या मिरवणुकीत मोठ्यानं गाणी वाजत असताना अचानक बैल उधळले. शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप इथे पारंपरिक उत्साहात सुरू असलेल्या बैलपोळ्याच्या मिरवणुकीदरम्यान एक दुर्घटना घडली. बैल उधळल्याने ते हातातून निसटले आणि बेफान होऊन उड्या मारत धावू लागले. दिसेल ते तुडवत है बैल पळत होते. गाडी, मुलं कोणीही पाहिलं नाही.
हातातून निसटलेल्या बैलांनी अचानक वेगाने धावत दोन चिमुरड्यांना तुडवलं. या घटनेमुळे क्षणभर गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवाने, हे दोन्ही चिमुरडे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही.
Shirur Accident VIDEO: पोळ्याच्या मिरवणुकीत उधळलेल्या बैलांनी 2 चिमुकल्यांना चिरडलं pic.twitter.com/rEchNZZJqh
— News18Lokmat (@News18lokmat) September 22, 2025
advertisement
दरम्यान, उधळलेल्या या बैलांचा मिरवणुकीत उपस्थित असलेल्या इतरांना कोणताही इजा झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे. स्थानिकांनी तत्परता दाखवत बैलांना आवर घातला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.गावकऱ्यांनी सांगितले की, बैलपोळा हा उत्सव जरी आनंदाचा असला तरी अशा घटनांमुळे सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेणं आवश्यक आहे. पोलिस आणि ग्रामपंचायतीनेही या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील वर्षीच्या आयोजनासाठी काटेकोर सुरक्षा उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 22, 2025 9:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirur Accident VIDEO: पोळ्याच्या मिरवणुकीत उधळलेल्या बैलांनी 2 चिमुकल्यांना चिरडलं