संभाजीनगरात नर्सचा संशयास्पद मृत्यू, रुग्णालयाच्या वॉशरुममध्ये इंजेक्शन घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको भागातील एम्स हॉस्पिटलमध्ये एका नर्सचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आहे

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको भागातील एम्स हॉस्पिटलमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका नर्सचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला आहे. संबंधित नर्स काही वेळ रुग्णालयातून गायब होती. ती कुठेच दिसत नसल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, त्यावेळी ती रुग्णालयाच्या वॉशरुममध्ये मृतावस्थेत आढळली आहे.
हर्षदा पद्माकर तायडे असं मृत आढळलेल्या २४ वर्षीय नर्सचं नाव आहे. रविवारी तिचा मृतदेह हॉस्पिटलच्या स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजेक्शन घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा तायडे ही एम्स हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती. रविवारी दुपारी बराच वेळ ती तिच्या जागेवर दिसली नाही. तिच्या सहकाऱ्यांनी तिला फोन केला असता, तिने आपण स्वच्छतागृहात असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिच्या सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी जाऊन पाहिले असता, ती स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
advertisement
यावेळी, तिच्याजवळ एक इंजेक्शनही सापडले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली असता, इंजेक्शन घेतल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
हर्षदाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, तिने स्वतःहून इंजेक्शन घेतले की आणखी काही कारण आहे, याचा तपास करण्यासाठी मृतदेह विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या घटनेची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगरात नर्सचा संशयास्पद मृत्यू, रुग्णालयाच्या वॉशरुममध्ये इंजेक्शन घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement