अर्थमंत्री अजित पवारांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवा, मंत्र्यांच्या संतापानंतर एकनाथ शिंदे आक्रमक

Last Updated:

Ajit Pawar: अर्थमंत्री अजित पवार हे निधी वाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक देत असल्याची तक्रार शिवसेना मंत्र्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

अजित पवार-एकनाथ शिंदे
अजित पवार-एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आणि त्यानंतर झालेल्या शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत निधी वाटपावरून मान-अपमान नाट्य रंगले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधी वाटपाच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त केला.
अर्थमंत्री अजित पवार हे निधी वाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक देत असल्याची तक्रार शिवसेना मंत्र्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. शिवसेना मंत्र्यांचा संताप पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीतच अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे शिवसेना मंत्र्यांना आदेश दिले.

मंत्र्यांचा हक्काचा निधी दिला जात नाही, शिवसेना मंत्र्यांची तक्रार 

advertisement
अर्थमंत्री अजित पवार यांच्या विभागात १४००/१४०० कोटी रुपयांचे दोन निधी आहेत. या निधी वाटपावर आणि त्यांच्या वितरणावर विशेष लक्ष ठेवण्यास एकनाथ शिंदे यांनी आमदार-मंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांची दिली. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा हक्काचा निधी दिला जात नाही, अशी तक्रार शिवसेना मंत्र्यांनी केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत शिवसेना मंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला.

संजय शिरसाट यांनी याआधी अजितदादांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता

याआधीही संजय शिरसाट यांनी अतिशय आक्रमकपणे अजित पवार यांच्याविरोधात पवित्रा घेतला होता. सामाजिक न्याय विभागाचा निधी अजित पवार यांनी वळवून आमच्या विभागावर अन्याय केल्याचे पत्रकार परिषद घेऊन शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या तक्रारीनंतर अजित पवार यांना अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अर्थमंत्री अजित पवारांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवा, मंत्र्यांच्या संतापानंतर एकनाथ शिंदे आक्रमक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement