पालिका निवडणुकांचा टेन्शन वाढणार, धनुष्यबाण कोणाचा, शिंदे की ठाकरे? उद्या ‘सुप्रीम’ सुनावणी

Last Updated:

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी पार पडणार आहे.

News18
News18
मुंबई :  महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला कारणीभूत ठरलेल्या शिवसेना फुटीवर बुधवारी अंतिम सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना कुणाची? शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण कुणाचा? याचा फैसला होणार असल्यानं याकडे देशाचं लक्ष लागलंय. या प्रकरणावर खरंतर 20 ऑगस्टलाच सुनावणी होणार होती.परंतु, न्यायालयानं याची सुनावणी लांबणीवर टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिलेला. खरं तर,ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचा उल्लेख करत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती. पण त्यांची ही विनंती न्यायालयानं मान्य केली नव्हती. पण, आता 8 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार असल्यानं, ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतीय संविधानाला धरुन निकाल लागला, तर तो ठाकरेंच्या बाजूनं लागेल,अशी आशा ॲड.असीम सरोदेंनी यांनी व्यक्त केलीय
शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी पार पडणार आहे. सुप्रिम कोर्टात होणाऱ्या सुनावणीमध्ये लेखी स्वरूपात दाखल झालेले मुद्दे युक्तीवादाचा आधार असणार आहेत, अशी माहिती अॅड. असिम सरोदे यांनी दिली आहे. दरम्यान निवडणूक आयोगानं पक्ष चिन्ह गोठवलं ही प्रक्रिया चुकीची आहे असं देखील सरोदे म्हणालेत..

काय आहे पक्ष चिन्हाचा वाद?

  • 21 जून 2022 रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं
  • शिंदेंनी शिवसेनेचे 40 आणि काही अपक्ष आमदारांसोबत बंड केलं
  • या बंडामुळे 29 जून रोजी महाविकास आघाडी सरकार पडले.
  • याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतलेली
  • 2023 मध्ये निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या स्वाधीन केलं.
  • त्यानंतर 2024मध्ये विधानसभा अध्यक्षांनी देखील शिवसेनेच्या आमदारांना पात्र ठरवलं
  • पण, सर्वोच्च न्यायालयात मात्र गेली तीन वर्ष शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल प्रलंबित आहे.
advertisement
ॲड असीम सरोदे म्हणाले, लवकर सुनावणी व्हावी अशी विनंती केली होती पण कोर्टाने सांगितले होते की वेळ नाही. उद्या अंतिम सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे.लेखी स्वरूपात दाखल झालेले मुद्दे युक्तीवादाचा आधार आहे. आमचे म्हणणे आहे की निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवले आहे. ती प्रक्रिया चुकीची आहे. आयोगाने पक्षचिन्हाचा निकाल देणं अपेक्षित होते परंतु ते एकनाथ शिंदेंना देऊन टाकले, हे चुकीचं आहे.
advertisement
विरोधात निकाल दिला तरी चालेल पण लवकर द्यावी. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे. निर्णय न झाल्याने जे लोक सत्तास्थानी आहेत परंतु ते बरोबर आहे असं नाही.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पालिका निवडणुकांचा टेन्शन वाढणार, धनुष्यबाण कोणाचा, शिंदे की ठाकरे? उद्या ‘सुप्रीम’ सुनावणी
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement