1-2 नाही, तर तब्बल तीन OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार Jolly LLB 3; कधी होणार रिलीज?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
ज्या चाहत्यांना Jolly LLB 3 थिएटरमध्ये पाहता आला नाही, ते आता घरबसल्या हा सिनेमा पाहू शकणार आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख आता नक्की झाली आहे.
advertisement
जवळपास १२० कोटी रुपये निर्मिती खर्च असलेल्या 'जॉली एलएलबी ३' ने व्यावसायिकदृष्ट्या चांगलीच छाप पाडली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर 'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात १०८.६५ कोटी रुपये कमावले आहेत. तर जगभरात या चित्रपटाने तब्बल १५७.७ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने आपले बजेट सहज वसूल केले असून, हिट चित्रपटांच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
प्रेक्षकांसाठी सर्वात मोठी चांगली बातमी म्हणजे 'जॉली एलएलबी ३' एकाच नव्हे, तर अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ पासून जिओ सिनेमा, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या तीन प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा येणे बाकी असले तरी, पुढच्या महिन्यात ही कोर्टरूम कॉमेडी ऑनलाइन पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.