'हा मला ॲक्टिंग शिकवणार?' अमिताभ बच्चन यांना नवखा हिरो समझत होता स्टारकिड, बिग बींनी झाप-झाप झापलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan KBC : अमिताभ बच्चन यांनी एका स्टारकिडसोबत काम करण्याचा एक गंमतीशीर अनुभव सांगितला, जो ऐकून सारेच हसून हसून लोटपोट झाले.
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे हिंदी चित्रपटसृष्टीवर अनेक दशकांपासून राज्य आहे, तसेच ते 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावरही अधिराज्य गाजवत आहेत. 'KBC 17' चा एक भाग खूपच मनोरंजक ठरला. या आठवड्यात बिग बींचा वाढदिवस शोमध्ये साजरा करण्यात आला, यासाठी त्यांचे जुने मित्र आणि प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा फरहान अख्तर उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी फरहानसोबत काम करण्याचा एक गंमतीशीर अनुभव सांगितला, जो ऐकून सारेच हसून हसून लोटपोट झाले.
अमिताभ बच्चन यांनी घेतली फरहान अख्तरची फिरकी
फरहान अख्तरने बिग बींना आठवण करून दिली की, "आपण दोघांनीही 'लक्ष्य' चित्रपट एकत्र केला आहे." हे ऐकताच अमिताभ बच्चन यांनी लगेच फरहानची फिरकी घ्यायला सुरुवात केली.
बिग बी गंमतीने म्हणाले, "या चित्रपटाच्या वेळी फरहान एकदा रात्री माझ्या खोलीत आला. त्याने मला विचारले, 'अमिताभ अंकल, तुम्हाला काही अडचण आहे का?' आम्हाला वाटले की, मी नवखा आहे आणि हा उस्ताद आहे, जो आम्हाला सांगत आहे की, 'बेटा, ॲक्टिंग कशी करायची!'" महानायकांनी अगदी गमतीशीर शैलीत फरहानची चांगलीच फिरकी घेतली, ज्यामुळे सेटवर एकच हशा पिकला.
advertisement
लक्ष्य चित्रपट २००४ मध्ये आला होता. त्यात हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, प्रीती झिंटा यांसारखे कलाकार होते. फरहान अख्तरने दिग्दर्शनात पदार्पण केलेला हा चित्रपट व्यावसायिकरित्या हिट झाला नव्हता.
जावेद आणि अमिताभ बच्चन यांच्यातील गप्पा
या विशेष भागात फरहानने आपले वडील जावेद अख्तर आणि अमिताभ बच्चन यांना काही मनोरंजक प्रश्न विचारले. त्याने दोघांना विचारले, "तुम्ही एकमेकांच्या कोणत्या चांगल्या गोष्टी 'चोरू' इच्छिता?" यावर लगेच जावेद अख्तर म्हणाले, "अमिताभ बच्चन यांच्यात जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, तेवढ्या क्वचितच कोणामध्ये असतील."
advertisement
advertisement
यानंतर फरहानने दुसरा एक गमतीशीर प्रश्न विचारला, "महिलांमध्ये जास्त लोकप्रिय कोण आहे?" यावर अमिताभ बच्चन यांनी लगेच जावेद अख्तर यांच्याकडे बोट दाखवले आणि दोघांनीही एकमेकांकडे पाहत मिश्किलपणे हसले. बच्चन आणि सलीम-जावेद या त्रयीने 'शोले'सारखे अनेक सुपरहिट चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हा मला ॲक्टिंग शिकवणार?' अमिताभ बच्चन यांना नवखा हिरो समझत होता स्टारकिड, बिग बींनी झाप-झाप झापलं