Pune : हाता-पाया पडले तरी दया दाखवली नाही, पुण्याच्या दाम्पत्यावर घरात घुसून तलवारीने हल्ला, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
किरकोळ कारणावरून तरुणाकडून दाम्पत्याच्या घरात घुसून तलवारीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
अभिजित पोते, प्रतिनिधी
पुणे : किरकोळ कारणावरून तरुणाकडून दाम्पत्याच्या घरात घुसून तलवारीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये महिला आरोपीकडे दया मागत होती, पण तरीही आरोपीने तलवारीने हल्ला केला. 56 वर्षांच्या या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी साजीद उर्फ डी.जे.मोहम्मद शेख, साकीब मोहम्मद शेख आणि त्याचे साथीदार शाहनवाज उर्फ चांद शेख आणि सुलतान उर्फ कैफर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 5 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या येरवडा भागामध्ये ही घटना घडली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आरोपी आपसात संगनमत करून फिर्यादीच्या घरासमोर गेले. रात्री झालेल्या वादाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करायला सुरूवात केली, यातील आरोपी साकीब मोहम्मद शेखने फिर्यादीच्या अंगावर दगड फेकून पारला, यानंतर आरोपीने तलवार काढून दाम्पत्यावर सपासप वार केले. तसंच आरोपींनी घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून घरातील भांड्यांचीही तोडफोड करून नुकसान केलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 07, 2025 9:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : हाता-पाया पडले तरी दया दाखवली नाही, पुण्याच्या दाम्पत्यावर घरात घुसून तलवारीने हल्ला, Video