Himachal Bus Landslide: तुफान पावसामुळे झालं भूस्खलन, ढिगाराखाली 30 प्रवाशांनी भरलेली बस सापडली, 15 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Last Updated:

बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते आणि बसच्या छतावर ढिगारा आणि दगड पडले. आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.

News18
News18
हिमाचल प्रदेशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसानंतर बिलासपूर जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला. जिल्ह्यातील बर्थीजवळील भालू इथं एका खाजगी बस भूस्खलनामध्ये सापडली आहे. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते आणि बसच्या छतावर ढिगारा आणि दगड पडले. आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. एका मुलाला जिवंत वाचवल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं मृतांची संख्या 15 वर पोहोचल्याची पुष्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोषी नावाच्या खाजगी बसला हा अपघात झाला आहे. भूस्खलन झाल्यामुळे बसवर ढिगारा आणि दगड पडल्यानं मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, परंतु मोठ्या प्रमाणात ढिगारा असल्यानं बचाव कार्यात अडथळा येत आहे.
advertisement
अपघातग्रस्त  बस मारोटनहून घुमरविनला जात होती. यादरम्यान, भल्लू पूल आणि बर्थीजवळील एक संपूर्ण टेकडी कोसळून बसवर पडली. ही घटना संध्याकाळी ६:२५ वाजता घडली. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्यांमुळे बचावकार्य कठीण होत आहे.
दरम्यान, घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. मदत आणि बचाव कार्य सुरू असून जेसीबी मशीनच्या मदतीने ढिगार उपसण्याचं काम सुरू आहे. एक रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. पण अजून किती लोक मरण पावले किंवा जखमी झाले हे अद्याप कळलेले नाही.
advertisement
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बस अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला, मदत कार्य जलद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकूर सुखविंदर सिंग सुखू यांनी दिले आहे. बिलासपूर जिल्ह्यातील झंडुता उपविभागातील बालुघाट भागात या खाजगी बसला भूस्खलनात धडकून झालेल्या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांना शोक व्यक्त केला आणि मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रार्थना केली. या कठीण काळात राज्य सरकार पीडित कुटुंबांसोबत खंबीरपणे उभं आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेल. मुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात आहेत आणि त्यांना मदत आणि बचावकार्य अधिक जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले जाईल आणि त्यांच्या उपचारांसाठी पुरेशी व्यवस्था केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.  मुख्यमंत्री शिमला येथून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.
मराठी बातम्या/देश/
Himachal Bus Landslide: तुफान पावसामुळे झालं भूस्खलन, ढिगाराखाली 30 प्रवाशांनी भरलेली बस सापडली, 15 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
Next Article
advertisement
OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement