हाच का महिलांचा सन्मान? शायना एनसींबद्दल वक्तव्यानंतर अरविंद सावंतांना शिंदे गटासह भाजपने सुनावलं

Last Updated:

ठाकरे गटाचे उमेदवार अमिन पटेल यांच्या प्रचारावेळी बोलताना अरविंद सावंत यांची जीभ घसरली. या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून अरविंद सावंत यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला.

News18
News18
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांना इम्पोर्टेड माल असं संबोधल्यानं वाद उफाळला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमिन पटेल यांच्या प्रचारावेळी बोलताना अरविंद सावंत यांची जीभ घसरली. या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून अरविंद सावंत यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला. शायना एनसी यांनीही अरविंद सांवत यांना चोख प्रत्युत्तर देताना ठाकरे आणि शरद पवार यांना सवाल केला आहे. तसंच मला माल म्हणणाऱ्यांचे २३ नोव्हेंबरला हाल होतील असंही शायना एनसी म्हणाल्या.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबद्दल वापरलेल्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो. अरविंद सावंत यांनी माफी मागायला हवी. एका महिलेचा सन्मान करण्याची पद्धत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना शिकवलीय. पण त्याच्या विरुद्ध काम अरविंद सावंत यांनी केल्याचं प्रसाद लाड म्हणाले.
advertisement
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. संजय शिरसाट म्हणाले की, शायना एनसी यांना अरविंद सावंत इम्पोर्टेड माल म्हणतात हीच का त्यांची महिलांबद्दलची भाषा? महिलांचा हाच का सन्मान?  आदित्य ठाकरे यांचा नेता आहे. या लोकांना तारतम्य राहिले नाही. उद्धव साहेब सहन करतात तर आम्ही काय बोलावे?
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हाच का महिलांचा सन्मान? शायना एनसींबद्दल वक्तव्यानंतर अरविंद सावंतांना शिंदे गटासह भाजपने सुनावलं
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement