शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा, कुणीच अपात्र होणार नाही, सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट
- Published by:Suraj
Last Updated:
राज्याच्या विधासनभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार असून आता आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची तारीख १० डिसेंबर असण्याची शक्यता आहे.
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी
दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुटीनंतर आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकांच्या सुनावणीवर आतापर्यंत फक्त तारखांवर तारखा मिळाल्या होत्या. राज्याच्या विधासनभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार असून आता पुढची सुनावणीची तारीख १० डिसेंबर अशी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणाला फक्त अकॅडमिक महत्त्व उरणार आहे. सुनावणीत काहीही झाले तरी कोणत्याही गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत. कारण सर्वच आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येईल.
advertisement
सर्वोच्च न्यायालयात गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण प्रलंबित आहे. आता या प्रकरणी १० डिसेंबरला सुनावणीची शक्यता आहे. तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळं कोणत्याही गटाच्या आमदारांवर अपात्र होण्याची वेळ येणार नाही. अशा स्थितीत या प्रकरणाला आता फक्त अकॅडमीक महत्त्व राहणार आहे.
advertisement
गेल्या अनेक महिन्यापासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही. फक्त तारखावर तारखा पाहायला मिळत आहेत. डी वाय चंद्रचूड सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच 10 डिसेंबरला सुनावणी होणार होती. आता या प्रकरणाची सुनावणी नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना स्वत: करतात की हे प्रकरण दुसऱ्या बेंचकडे वर्ग केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2024 1:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलासा, कुणीच अपात्र होणार नाही, सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट


