मी त्याला ओळखत नाही... संजय राऊतांच्या सनसनाटी आरोपांवर श्रीकांत शिंदे संतापले

Last Updated:

झारखंडमधील मद्य विक्री घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखे याला अटक झाली. हाच अमित साळुंखे शिंदे पिता पुत्रांच्या जवळचा असल्याचे सांगितले जाते.

संजय राऊत-श्रीकांत शिंदे
संजय राऊत-श्रीकांत शिंदे
कोल्हापूर : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुमित फॅसिलिटीसंदर्भात केलेल्या आरोपावर प्रश्न विचारताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे चांगलेच भडकले. कोण संजय राऊत? मी कोणत्या संजय राऊतला ओळखत नाही असे म्हणत त्यांचा संताप श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
झारखंडमधील मद्य विक्री घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखे याला अटक झाली. हाच अमित साळुंखे शिंदे पिता पुत्रांच्या जवळचा असल्याचे सांगितले जाते. अमित साळुंखे याने श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला भरघोस निधीही दिल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिंदे पिता-पुत्रावर गंभीर आरोप केले. सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदेंनी हजारो कोटींचे घोटाळे केले, असा सनसनाटी आरोप केला. राऊत यांच्या याच आरोपावर श्रीकांत शिंदे संतापले.
advertisement
जो रोज उठून कुठलाही पुरावा न देता आरोप करतो, शिव्या शाप देतो. त्याच्या आरोपावर काय उत्तरे देऊ? संजय राऊत यांच्या आरोपांवर उत्तर द्यायला मी बांधील नाही. पुरावे असतील तर समोर बसून दाखवले पाहिजेत, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

मी त्याला ओळखत नाही

कुणी कुणावर आरोप करत असेल तर ते पुराव्यानिशी केले पाहिजेत. आरोप करणाऱ्याची बाजू माध्यमांनी तपासली पाहिजे. मला कोण प्रश्न विचारत आहे त्याला मी ओळखत नाही असे म्हणत संजय राऊतांच्या टीकेवर उत्तर देणे श्रीकांत शिंदे यांनी टाळले.
advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार? श्रीकांत शिंदे म्हणाले...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रश्नावर श्रीकांत शिंदे म्हणाले, महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत. महायुतीला ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळालं तसेच यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील मिळेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी त्याला ओळखत नाही... संजय राऊतांच्या सनसनाटी आरोपांवर श्रीकांत शिंदे संतापले
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement