दसऱ्याला ठाकरेंना कोकणात हादरा; शिंदेंच्या गळाला मोठा मासा, बडा नेता शिवधनुष्य हातात घेणार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.
सिंधुदुर्ग : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठे उलटफेर होताना दिसत होते. काल पर्यंत एका पक्षात असलेले नेते दुसऱ्या दिवशी भलत्याच पक्षात जाताना दिसत आहेत. सध्या पक्ष बदलण्याचा हंगाम सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यात आता तळकोकणात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का देत बडा नेता आपल्याकडे ओढला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेचे टेन्शन मात्र वाढले आहे. या नेत्याच्या प्रवेशाने तळकोकणातील राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून दिपक केसरकर यांच्या विरोधात लढलेले राजन तेली हे मुंबईतील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठाला या सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. राजन तेली आणि कुडाळ मालवणचे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची भेट झाली आहे. यानंतर राजन तेली हे प्रवेशासाठी दसरा मेळाव्याला रवाना झाले आहेत. राजन तेली यांच्या प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेची तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताकद यामुळे वाढणार आहे.
नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक
advertisement
राजन तेली यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम करत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आहेत. ते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा तेली हे त्यांच्यासोबत होते. त्यानंतर प्रत्येक वेळी ते राणेंच्या सोबतच राहिले.
view commentsLocation :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
Oct 02, 2025 7:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दसऱ्याला ठाकरेंना कोकणात हादरा; शिंदेंच्या गळाला मोठा मासा, बडा नेता शिवधनुष्य हातात घेणार










