Pune News : सिंहगड किल्ल्यावरून तरुण बेपत्ता, 1000 फूट खोल दरीत कोसळल्याची भीती, पर्यटकांमध्ये घबराट

Last Updated:

Pune News : बुधवारी संध्याकाळी येथे एक धक्कादायक घटना घडली. गौतम गायकवाड नावाचा एक तरुण किल्ल्यावरून बेपत्ता झाला आहे.

सिंहगड किल्ल्यावरून तरुण बेपत्ता, 1000 फूट खोल दरीत   कोसळल्याची भीती, पर्यटकांमध्ये घबराट
सिंहगड किल्ल्यावरून तरुण बेपत्ता, 1000 फूट खोल दरीत कोसळल्याची भीती, पर्यटकांमध्ये घबराट
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची सतत वर्दळ असते. सध्या पावसाळ्यामुळे पर्यटकांची पावले सिंहगडाकडे वळली आहेत. मात्र, बुधवारी संध्याकाळी येथे एक धक्कादायक घटना घडली. गौतम गायकवाड नावाचा एक तरुण किल्ल्यावरून बेपत्ता झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा परिसरात शेवटचा दिसला होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. त्यामुळे तो या कड्यावरून घसरून दरीत पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हा तानाजी कडा जवळपास 1000 फूट खोल आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रात्री उशिरा शोधकार्य सुरू करणे शक्य झाले नाही. मात्र, आज सकाळपासून पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून कसून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस दल, बचाव पथके तसेच जंगल परिसराचा अनुभव असलेले काही स्वयंसेवक मिळून शोधकार्यात सहभागी झाले आहेत.
advertisement
पर्यटनस्थळ म्हणून सिंहगड किल्ल्यावर हजारो नागरिक फिरायला येतात. अशावेळी अशा घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही काळापूर्वी देखील सिंहगड कड्यांवरून घसरून पर्यटक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गौतम गायकवाडचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र, तो खोल दरीत कोसळल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी शोधमोहीम अधिक गतीने सुरू केली आहे. या घटनेमुळे सिंहगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहेत. पुढील काही तासांत शोधकार्याला यश मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune News : सिंहगड किल्ल्यावरून तरुण बेपत्ता, 1000 फूट खोल दरीत कोसळल्याची भीती, पर्यटकांमध्ये घबराट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement