priyanka gandhi : ...मग तुम्ही 10 वर्षात काय केलं? लातूरमधून प्रियांका गांधींचा थेट मोदींना सवाल

Last Updated:

'कधी मोदी आफ्रिका, जपान, युरोपमध्ये दिसतात. कधी त्यांना इकडे बोलावतात. सांगितले जाते की मोदी काहीही करू शकतात. 10 वर्षांत काय बंद केले माहित आहे?

News18
News18
लातूर : '70 वर्षांमध्ये काँग्रेस काहीच केलं नाही तर तुम्ही 10 वर्षात काय केलं. मोदींच्या काळात मुलांना शिक्षण नाही. गरीब महिलांना रोजगार नाही.आज 70 कोटी बेरोजगार केंद्रात हजारो जागा रिक्त आहे. शेतकऱ्यांच्या साहित्यावर जीएसटी लावला आहे, आमचं सरकार आल्यावर जीएसटी रद्द करू, असं म्हणत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांच्यानंतर आज लातूरमध्ये प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसची सभा पार पडली. या सभेत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आणि भाजपला थेट सवाल विचारला.
'लातूर म्हणजे सामाजिक न्यायाची जमीन आहे, या जमिनाला नमन आहे. तुमच्या जमिनीने दोन दोन मुख्यमंत्री दिले, विकास कामे झाली त्यात कॉंग्रेसचे मोठे योगदान आहे. आज 70 कोटी बेरोजगार केंद्रात हजारो जागा रिक्त आहे तरीही मोदी सरकार जागा भरत नाही. देशात 45 वर्षात बेरोजगारी नव्हती तेवढी आज बेरोजगारी आहे. 10 वर्षाच्या काळात महागाई वाढली. गॅस सिलेंडरचे भाव वाढले आहे. मात्र निवडणुका आल्या आणि गॅसचे भाव कमी केले. शेतीच्या सर्व साधनावर जीएसटी लावली, वसुली करत आहे या सरकारमुळे जनता संकटात आहे, अशी टीका प्रियांका गांधींनी केली.
advertisement
'कधी मोदी आफ्रिका, जपान, युरोपमध्ये दिसतात. कधी त्यांना इकडे बोलावतात. सांगितले जाते की मोदी काहीही करू शकतात. 10 वर्षांत काय बंद केले माहित आहे? रोजगार बंद केले. कॉंग्रेसची जिथे सरकार तिथे आहे, आम्ही महिलांना दोन हजार रुपये आम्ही देतो. पैशाच्या जोरावर सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र सरकार पाडलं. आमच्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं. संविधानावर देशातील सर्व नागरिकांचा समान अधिकार आहे. संविधान बदलण्याचा मोदींचा डाव आहे, असा टीकाही प्रियांका गांधींनी केली.
advertisement
'70 वर्षांमध्ये काँग्रेस काहीच केलं नाही तर तुम्ही 10 वर्षात काय केलं. मोदींच्या काळात मुलांना शिक्षण नाही. गरीब महिलांना रोजगार नाही, मोदी आमच्या कुटुंबावर बोलतात. पंतप्रधान मोदी विदेशी नेत्यांसोबत जास्त दिसले.
देश आपला आहे, मतदान आपलं आहे. त्यामुळे हलक्यात घेऊ नका, काँग्रेस सरकार आली तर महिलांना 1 लाख रुपये मिळणार. आमची सत्ता आल्यावर जीएसटी रद्द करणार, मोदी सरकार मे महिन्यात 30 लाख पदे रिक्त आमची सत्ता आली तर 30 लाख पदे भरणार आहे, असं आश्वासनही प्रियांकांनी केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
priyanka gandhi : ...मग तुम्ही 10 वर्षात काय केलं? लातूरमधून प्रियांका गांधींचा थेट मोदींना सवाल
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement