10 दिवस ICU मध्ये उपचार, समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयातून मोठी अपडेट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कष्टकऱ्यांचे आणि श्रमिकांचे नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक खालावली असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: कष्टकऱ्यांचे आणि श्रमिकांचे नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.
डॉ. बाबा आढाव यांच्या तब्येतीबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार
सध्या पूना हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपूर्ण टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या वयामुळे आणि एकूण प्रकृतीमुळे डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
advertisement
डॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील सामाजिक आणि कामगार चळवळीतील एक मोठे व्यक्तिमत्व आहेत. 'एक गाव, एक पाणवठा' यांसारख्या सामाजिक कार्यामुळे तसेच असंघटित कामगार आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या लढ्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 9:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
10 दिवस ICU मध्ये उपचार, समाजसेवक बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयातून मोठी अपडेट


