सोलापूरात नवविवाहितेसोबत घडलं भयंकर, अंघोळीच्या बाथरुममध्ये गेली अन् तडफडून मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Solapur News: सोलापूरच्या माढ्या तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूरच्या माढ्या तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित विवाहित तरुणी अंघोळीच्या बाथरुममध्ये गेली होती. यावेळी घडलेल्या एका अनर्थामुळे तिचा जागीच तडफडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती माढा पोलिसांना दिली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. एका नवविवाहित तरुणीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साक्षी रणवीर चांगभले असं मृत पावलेल्या २२ वर्षीय नवविवाहित तरुणीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचं माढ्यातील एका तरुणासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण गुरुवारची सकाळ साक्षीसाठी जीवघेणी ठरली आहे.
घटनेच्या वेळी ती अंघोळीच्या बाथरुममध्ये गेली होती. तिथे हिटर लावून पाणी गरम करायला लावला होता. यावेळी हिटरला धक्का लागल्याने विवाहितेला विजेचा जोरदार धक्का बसला, त्या बाथरुममध्येच खाली कोसळल्या. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने विद्युत प्रवाह बंद केला. तसेच साक्षीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
advertisement
रुग्णालयात जाताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साक्षी चांगभले यांना मृत घोषित केलं. २२ वर्षीय विवाहितेचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 03, 2025 10:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापूरात नवविवाहितेसोबत घडलं भयंकर, अंघोळीच्या बाथरुममध्ये गेली अन् तडफडून मृत्यू