Pune Accident : पुण्यात रील स्टार प्रतिक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक! भिगवणमध्ये नेमकं काय घडलं?

Last Updated:

Reel Star Pratik Shinde Accident : अपघातात धडक इतकी जबरदस्त होती की, क्रेटा गाडी पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. त्यामुळे तीनही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

Reel Star Pratik Shinde Accident
Reel Star Pratik Shinde Accident
Pune Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर मदनवाडी (सकुंडे वस्ती) गावच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या एका रिल स्टारने आपल्या फॉर्च्युनरने क्रेटा आणि व्हॅगनर गाडीला धडक दिल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी, फॉर्च्युनर चालकाविरुद्ध भिगवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतीक शिंदेवर गुन्हा दाखल

प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील बाळासाहेब होले हे आपल्या क्रेटा गाडीतून प्रवास करत असताना, पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनरने (एम.एच. 42 बी.एस. 0111) जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, क्रेटा गाडी पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. त्यामुळे तीनही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.
advertisement

प्रतीक स्वतः गाडी चालवत होता

अवघ्या महिन्याभरापूर्वीच मोठ्या दिमाखात फॉर्च्युनर गाडी खरेदी करणाऱ्या रिल स्टार प्रतीक शिंदेची गाडीच या अपघाताला कारणीभूत ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक स्वतः गाडी चालवत होता. अपघातानंतर परिसरात 'लोकप्रियतेच्या नावाखाली फिल्मी स्टाईलने गाडी चालवणाऱ्यांवर आळा बसलाच पाहिजे', अशा चर्चा सुरू आहेत. या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी कोणालाही दुखापत झाली नाही, ही बाब दिलासादायक आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : पुण्यात रील स्टार प्रतिक शिंदेचा अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक! भिगवणमध्ये नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement