Solapur: डॉ. वळसंगकर प्रकरणात आरोपी २ महिन्यानंतर जेलबाहेर, कोर्टाकडून जामीन मंजूर

Last Updated:

Solapur News: प्रसिद्ध डॉ. वळसंगकर यांनी १७ एप्रिल रोजी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २० एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.

डॉ. वळसंगकर-मनीषा मुसळे
डॉ. वळसंगकर-मनीषा मुसळे
सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे हिला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वीच सोलापूर पोलिसांकडून या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपी मनीषा मुसळे हिच्यावर पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मनीषा माने मुसळे अटकेत होत्या. डॉ. वळसंगकर यांनी १७ एप्रिल रोजी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी २० एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. मनीषा मुसळे माने हिच्या सततच्या धमक्यांना घाबरून वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याचे बोलले गेले. मनीषा मुसळे हिला तब्बल ६६ दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आलाय.
advertisement

एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपी मनीषाला अटी शर्तींसह जामीन मंजूर

सोलापुरात सत्र न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीत एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपी मनीषा मुसळे हिला काही अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला. सत्र न्यायालयाने आरोपीच्या जामीन अर्जावर आज आपला निर्णय दिला, असे आरोपीचे वकील अॅड प्रशांत नवगिरे यांनी माहिती दिली.

मनीषा मुसळे हिच्यावरडॉ. वळसंगकरांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका

advertisement
आठ दिवसांपूर्वीच पोलिसांकडून या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून आरोपी मनीषा मुसळे हिच्यावर पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे. दरम्यान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपली भूमिका मांडण्यासाठी मनीषा मुसळे माध्यमांशी बोलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: डॉ. वळसंगकर प्रकरणात आरोपी २ महिन्यानंतर जेलबाहेर, कोर्टाकडून जामीन मंजूर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement