सोलापुरात भाऊ-बहीण तयार करतात गांडूळ खत, नेमकी काय आहे यामागची संकल्पना, तुम्ही कराल कौतुक!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून वेगवेगळी नैसर्गिक प्रक्रिया करून गांडूळ खताची निर्मिती केली आहे. आजकाल शेतकरी रासायनिक खत शेतामध्ये वापरत आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील प्रा. उमा बिराजदार आणि रुद्रप्पा बिराजदार या भावंडांनी आध्यात्मिक प्रेरणा घेतली आणि त्यातून गोशाळा उभारली. या गोशाळेच्या माध्यमातून भाकड गायींना आश्रय देत खिल्लार गाईच्या माध्यमातून गांडूळ खत तयार केले आणि या खताला चांगलीच मागणी मिळत आहे. याबाबत लोकल18 च्या टीमने प्राध्यापक उमा बिराजदार यांच्याशी संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून वेगवेगळी नैसर्गिक प्रक्रिया करून गांडूळ खताची निर्मिती केली आहे. आजकाल शेतकरी रासायनिक खत शेतामध्ये वापरत आहे. जे शेतकरी रासायनिक खताचा वापर करून पीक घेत आहेत. त्यामुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होत आहे आणि त्यामुळेच वेगवेगळे आजारही होत आहेत.
ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेचे पुण्यात जोरदार स्वागत, दगडूशेठ गणपतीचेही घेतले दर्शन, म्हणाला…., VIDEO
बीपी, शुगर, हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या रोगाला मनुष्य बळी पडत आहे. पूर्वीच्या काळी शेतकरी सेंद्रिय शेती करत होते. आता रासायनिक खत आल्यामुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. रासायनिक खत वापरल्यामुळे लवकर पीक तयार होतो आणि त्यामुळे मनुष्यला लवकरात लवकर कोणत्या ना कोणत्या रोगाला बळी पळतो आणि त्याचा मृत्यूही होतो.
advertisement
जर आपल्याला जीवन सुखमय करायचं असेल, तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळला पाहिजे. गांडूळ खताकडे वळलं पाहिजे. गांडूळ खत निर्मितीसाठी जवळजवळ तीन महिन्याचा कालावधी लागतो. गाईचं जे शेण असते त्याला दीड महिने कुजवावे लागतात. त्यानंतर प्याड मध्ये घालून परत दीड महिन्यासाठी गांडूळ खत तयार होण्यासाठी ते ठेवावे लागतात. तसेच या खताचा वापर करुन आपण सेंद्रिय शेती करू शकतो आणि आपलं जीवन हे निरोगी राहतो आणि आपलं पीक सुद्धा जोमाने येते, असे त्या म्हणाल्या.
advertisement
प्रा. उमा बिराजदार यांच्या गोशाळेजवळ येऊन शेतकरी गांडूळ खत घेऊन जातात. ज्या शेतकऱ्याची डाळिंब बाग, द्राक्षबाग, आंब्याची बाग, ऊसाची शेती असेल ते सर्व जण याठिकाणी येतात आणि गांडूळ खत खरेदी करुन घेऊन जातात. यासोबतच सोलापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक मॉल आहे, त्याठिकाणीही हे गांडूळ खत विक्री केले जाते.
advertisement
गांडूळ खताची किरकोळ विक्री 20 रुपये किलो या दराने केली जाते. तर एका गांडूळ खताच्या बॅगची किंमत 750 रुपये आहे. शेतकऱ्यांनी जर रासायनिक खतांकडे कल तुमचा जास्त असेल तर तुमची शेती हे नापिक होईल आणि जमिनीचा कस कमी होईल, सध्या वेळ गेलेली नसून शेतकऱ्यांनी सेंद्रिय गांडूळ खताचा वापर करावा, असे आवाहन प्रा. उमा बिराजदार यांनी केले आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
August 08, 2024 8:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापुरात भाऊ-बहीण तयार करतात गांडूळ खत, नेमकी काय आहे यामागची संकल्पना, तुम्ही कराल कौतुक!

