बर्गेसोबत अफेअर, पूजा गायकवाडने आणखी कुणाला फसवलं? पोलिसांनी लावला ट्रॅप, कुंडली बाहेर निघणार

Last Updated:

पोलिसांनी पूजा गायकवाडची कुंडली काढायला सुरुवात केली आहे. पूजा गायकवाड माजी उपसरपंच गोविंद बर्गे याच्यासह आणखी कुणाशी बोलत होती? तिचं कुणाशी अफेअर होतं का? याचा तपास पोलीस करत आहेत.

News18
News18
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी बार्शीत कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पूजा गायकवाडला अटक केली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे तिला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा गायकवाडने गोविंद बर्गे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक लूट केली होती. तिने बार्शी परिसरात बर्गे यांच्या पैशांतून पावणे दोन गुंठे जमीन घेतल्याची माहिती अलीकडेच समोर आली होती. या जमीन खरेदीखतावर साक्षीदार म्हणून पूजाच्या भावाने सही केल्याचं देखील समोर आलं आहे.
advertisement
आता पोलिसांनी पूजा गायकवाडची कुंडली काढायला सुरुवात केली आहे. पूजा गायकवाड माजी उपसरपंच गोविंद बर्गे याच्यासह आणखी कुणाशी बोलत होती? तिचं कुणाशी अफेअर होतं का? ती कुणाच्या संपर्कात होती का? याची डिटेल माहिती काढण्यासाठी पोलिसांनी ट्रॅप टाकला आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडचे कॉल डिटेल्स आणि व्हॉट्सअॅप मॅसेजिंगचा डेटा मागवला आहे. यामुळे पूजा आणखी कुणाच्या संपर्कात होती. गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात तिचा काय सहभाग होता, याचा तपशील समोर येणार आहे.
advertisement
याशिवाय गोविंद बर्गे यांनी ज्या पिस्तूलमधून स्वत:वर गोळी झाडल्याचा दावा केला जातोय. ते पिस्तूल कुणाचं होतं? याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांनी संबंधित विभागाकडे मागवली आहे. आज पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे हीच कारणं सांगून पोलीस पुन्हा एकदा पूजाची पोलीस कोठडी मागू शकतात. आता तिला पोलीस कोठडी मिळणार की तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
बर्गेसोबत अफेअर, पूजा गायकवाडने आणखी कुणाला फसवलं? पोलिसांनी लावला ट्रॅप, कुंडली बाहेर निघणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement