Shirdi : बायकोसोबत रोजच्या कटकटीला वैतागला, जावई सासरवाडीत पोहोचला आणि तिघांना संपवलं!
- Published by:Shreyas
Last Updated:
शिर्डीजवळील सावळीविहीर गावात जावयाने सासुरवाडीत भीषण हत्याकांड केलं आहे. किरकोळ घरगुती वादातून कुटुंबावर केलेल्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागला आहे.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी
शिर्डी, 21 सप्टेंबर : शिर्डीजवळील सावळीविहीर गावात जावयाने सासुरवाडीत भीषण हत्याकांड केलं आहे. किरकोळ घरगुती वादातून कुटुंबावर केलेल्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागला आहे, तर घरातले तीन नातेवाईक गंभीर जखमी आहेत. सावळीविहीर गावातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर जावयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
जावयाने केलेल्या या हल्ल्यात पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी रात्री सासुरवाडीत हे भीषण हत्याकांड केलं. धारदार चाकूने वार केल्यामुळे सुरेशची पत्नी वर्षा, मेव्हणा रोहित आणि आजेसासू हिराबाई यांना जीव गमवावा लागला. तर सासू-सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डीीतल साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी दाखल केलं, पण आधीच तिघांचा मृत्यू झाला होता, तर तिघांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पोलिसांनी तातडीने चार पथकं रवाना केली आणि नाकाबंदी करत पहाटेच्या वेळी नाशिकहून रेल्वेने फरार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सुरेश निकम आणि रोशन निकम यांना अटक केली.
advertisement
आठ वर्षांपूर्वी सुरेशचा विवाह वर्षासोबत झाला होता, त्यांना दोन लहान मुलीही आहेत. वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहातून सुरेशने हे हत्याकांड केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जावयाने केलेल्या या भीषण हत्याकांडामुळे शिर्डीमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत.
जावयाने केलेल्या या हत्याकांडामध्ये पत्नी वर्षा निकम (वय 24 वर्ष), मेव्हणा रोहित चांगदेव गायकवाड (वय 25) आणि आजेसासू हिराबाई द्रौपद गायकवाड (वय 70) यांचा मृत्यू झाला. तर सासरे चांगदेव द्रोपद गायकवाड (वय 55), सासू संगीता चांगदेव गायकवाड (वय 45) आणि मेव्हणी योगिता महेंद्र जाधव (वय 30) अशी तीन जखमींची नावं आहेत.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Sep 21, 2023 7:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi : बायकोसोबत रोजच्या कटकटीला वैतागला, जावई सासरवाडीत पोहोचला आणि तिघांना संपवलं!









