मत्स्यप्रेमींसाठी मोठी बातमी! 54 प्रजातींच्या मासेमारीवर निर्बंध, केंद्राच्या शिफारसीनंतर राज्य सरकारचा निर्णय

Last Updated:

आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीने अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५८ प्रकारच्या संरक्षणासाठी शिफारस केली होती.

News18
News18
मुंबई, 14 नोव्हेंबर : कोवळे मासे मारल्याने माशांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेल्या शिफारसीनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोवळे मासे मारण्यावर बंदी घालण्यात आली  असून यामध्ये ५४ प्रकारच्या माशांचा समावेश आहे. ५४ प्रकारचे लहान मासे मारण्यावर आजपासून बंदी घालण्यात आली आहे. जर हा आदेश मोडला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
मासेमारीला बंदी घातलेल्यांमध्ये बोंबील, पापलेट, कोळंबी, खेकडा यासह ५४ प्रकारच्या माशांचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी यांत्रिक पद्धतीने वाढत्या मासेमारीने माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यांत्रिकी पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीत लहान मासेही पकडले जातात. त्यातच मासेमारीवर बंदीचा कालावधी ९० दिवस होता तो ६१ दिवस केल्यानं आणि बंदी असतानाही अवैध मासेमारी सुरू राहिल्याने माशांच्या वाढीवर, उत्पादनावर परिणाम झाला. उत्पादनात घट होऊन मच्छिमारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
advertisement
आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीने अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५८ प्रकारच्या संरक्षणासाठी शिफारस केली होती. त्यापैकी ५४ प्रजातींच्या कोवळ्या माशांच्या मासेमारीवर राज्य सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे पारंपरिक मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही. आता ५४ प्रकारच्या मासेमारीवर, खरेदी-विक्रीवर बंदी असेल.
advertisement
मासे किती आकारमानाचे असावेत याची गाईडलाईन्स
पाॅपलेट - १३५ मिमी
बोंबिल - १८५ मिमी
घोळ - ७०० मिमी
शिंगाडा - २९० मिमी
ढोमा - १६० मिमी
कुपा - ३८० ते ५०० मिमी
मुशी - ३७५ मिमी
बांगडा - ११० ते २६० मिमी
हालवा - १६९ मिमी
खेकडे , चिंबोरे - ७० ते ९० मिमी
advertisement
सुरमई - ३७० मिमी
मासे विक्रेते यांच्याकडून या निर्णायाचे स्वागत करण्यात आले आ.हे हे करणे गरजेचे आहे तरच मासे पुढच्या पिढीला मिळतील असं मत अनेकांनी व्यक्त केले आहे. नष्ट होणाऱ्या प्रजातींचेही यामुळे संवर्धन होईल अशी अपेक्षा मच्छिमारांनी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मत्स्यप्रेमींसाठी मोठी बातमी! 54 प्रजातींच्या मासेमारीवर निर्बंध, केंद्राच्या शिफारसीनंतर राज्य सरकारचा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement