Beed: 'पाय तोड त्याचा..' उपसरपंचाला महामार्गावर अडवून लाठ्या-कोयत्याने मारहाण, 'गँग्स ऑफ बीड'मधला भयानक VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावात ही घटना घडली आहे. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना टोळक्याने अमानुषपणे मारहाण केली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडचा बिहार झाल्याचा गुन्हेगारीचा भेसूर चेहरा समोर आला. पण, या प्रकरणानंतरही बीडमध्ये गुन्हेगारी काही कमी झाली नाही. खून आणि मारहाणीच्या घटना सुरूच आहे. अशातच माजलगाव तालुक्यातील उपसरपंचाला रस्त्यावर अडवून गुंडांनी लोखंडी पाईप, कोयत्या आणि दगडाने अमानुषपणे मारहाण केली. या घटनेना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावात ही घटना घडली आहे. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना टोळक्याने अमानुषपणे मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्याची माहिती आता समोर आली आहे. लक्ष्मण चव्हाण यांनी ग्रामसभेमध्ये चुकीच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थितीत केला होता. याचा राग धरून गावातील ग्रामसभेत चुकीच्या कामाला विरोध केला म्हणून सरपंच पती आणि चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून चव्हाण यांना मारहाण करण्यात आली.
advertisement
बीडमध्ये आणखी एक बेदम मारहाणीचा व्हिडिओ आला समोर,
तरुणाला रस्त्यावर अडवून मारहाण, ग्रामसभेत चुकीच्या कामा संदर्भात प्रश्न उपस्थित केला म्हणून केली मारहाण pic.twitter.com/VGfWsPRo2I
— News18Lokmat (@News18lokmat) July 12, 2025
लक्ष्मण चव्हाण आणि त्यांचा साथीदार हे दोघे राष्ट्रीय महामार्ग 222 वरून पाच वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते. यावेळी काही गुंड हे त्यांचा पाठलाग करत होते. महामार्गावर या गावगुंडांनी गाडी अडवली आणि चव्हाण यांना बेदम मारहाण सुरू केली. चव्हाण यांना लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या कानाचा पडदा फाटला, हाता पायाला फ्रॅक्चर आले आहे. त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी चव्हाण यांचा जबाब नोंदवला. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
advertisement
'पाय तोड' व्हिडीओ केला रेकॉर्ड
view commentsया टोळक्याने चव्हाण यांचा पाठलाग करून महामार्गावर अडवलं होतं. काही तरुण हे दुचाकीवरून पाठलाग करत होते, तर काही जण हे चारचाकी कारमध्ये होते. चव्हाण येताना दिसले तसे सगळे धावून आले आणि महामार्गावरच त्यांना मारहाण सुरू केली. या टोळक्यातील एकाने मारहाण करताना व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. गंभीर जखमी लक्ष्मण चव्हाण यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
July 12, 2025 9:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed: 'पाय तोड त्याचा..' उपसरपंचाला महामार्गावर अडवून लाठ्या-कोयत्याने मारहाण, 'गँग्स ऑफ बीड'मधला भयानक VIDEO


