माझी ताकद नगण्य आहे, असं समजू नका, सुनील तटकरेंच्या भरत गोगावलेंना कानपिचक्या
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आजुबाजूच्या लोकांपासून जरा सावध राहा, माझ्या पक्षाला हात लावू नका, असा इशारा सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंना दिला आहे.
दिनेश पिसाट, रायगड : विधानसभेला निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी जाहीर सभेतून शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले यांना इशारा दिला आहे. माझी ताकद नगण्य आहे, असं समजू नका, अशा शब्दात सुनील तटकरे यांनी भरतशेठ गोगावले यांच्या कानपिचक्या घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी सभास्थळी भरत गोगावले उपस्थित होते.
महायुतीने महाड विधानसभा मतदार संघातून शिंदे गटाचे नेते भरतशेठ गोगावले यांना तिकीट दिलं आहे.त्याच्या विरोधात ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान बुधवारी भरतशेठ गोगावले यांच्या प्रचारासाठी सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी प्रचाराच्या व्यासपीठावरूनच सूनील तटकरे यांनी भरत गोगावले यांना गर्भित इशारा दिला आहे.
खरं तर तटकरे आणि भरत गोगावले हा काय वाद नवीन नाही. हा पुर्वापार चालत आला आहे. त्यात आता महायुतीतल्या घटक पक्षाने राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना फोडल्याने सुनील तटकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. आजुबाजूच्या लोकांपासून जरा सावध राहा, माझ्या पक्षाला हात लावू नका, असा इशारा सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंना दिला आहे. तसेच माझी ताकद नगण्य असण्याचं काम तुमचे कोण जवळचे करत असतील तर ते तुमच्या विरोधात काम करतायत. त्यामुळे सावधानतेचा इशारा मी वडीलधाऱ्या नात्याने देत असल्याचेही सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
advertisement
दरम्यान लोकसभा निवडणुकी दरम्यान रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे यांना उमेदवारी दिल्यामुळे भरतशेठ गोगावले नाराज असल्याची चर्चा होती. या नाराजी दरम्यान गोगावलेंनी तटकरेंना इशारा देखील दिला होता. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना निवडून देण्याची गॅरंटी घेतली आहे. तशीच गॅरंटी त्यांनी विधानसभा निवडणुकीत आमच्यासाठी घ्यावी, नसता आम्ही त्यांना दाखवून देऊ, अशा इशारा गोगावलेंनी तटकरेंना दिला होता.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
Nov 07, 2024 12:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माझी ताकद नगण्य आहे, असं समजू नका, सुनील तटकरेंच्या भरत गोगावलेंना कानपिचक्या










